पारशी धर्म

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
इराणच्या याझ्दमधील एक पारशी मंदिर

पारशी (इंग्लिश: Zoroastrianism) हा झरथ्रुस्ट्र ह्या संताच्या शिकवणीमधून निर्माण झालेला एक धर्मतत्त्वज्ञान आहे. इ.स. पूर्व सहाव्या शतकामध्ये पर्शियामध्ये स्थापन झालेला हा धर्म एकेकाळी जगातील सर्वात मोठ्या धर्मांपैकी एक होता.[१] स्थापनेनंतर दहा शतके पारशी हा इराणी लोकांचा राष्ट्रीय धर्म होता. अलेक्झांडर द ग्रेटने हखामनी साम्राज्यासोबत केलेल्या युद्धानंतर पारशी धर्माची वाढ खुंटली व इ.स. सातव्या शतकातील इस्लामच्या उदयानंतर पारशी धर्माचा ऱ्हास सुरू झाला. पारशी धर्माची स्वतंत्र अशी विचार प्रणाली आहे

सध्या भारतात जगातील सर्वाधिक पारशी धर्मीय राहतात. पारशी व इराणी हे दोन पारशी धर्माचे सर्वात मोठे संप्रदाय आहेत. अवेस्ता हा पारशी लोकांचा धर्मग्रंथ आहे. पारशी लोक आणि वैदिक संस्कृतीचे लोक यांच्यामध्ये प्राचीन काळापासून संबंध होते पारशी धर्माचा पवित्र ग्रंथाचे नाव अवस्था असे आहे ऋग्वेद आणि अवस्था यांच्यातील भाषेमध्ये साम्य आढळते फारशी लोक इराणच्या पार्स नावाच्या प्रांतातून भारतामध्ये आले म्हणून त्यांना पारशी या नावाने ओळखले जाते. ते प्रथम गुजरात मध्ये आले . ते इसवी सनाच्या आठव्या शतकात आले असावेत असे काही अभ्यासकांचे मत आहे. इरदृष्ट हे पारशी धर्माचे संस्थापक होते. अहुर या नावाने त्यांच्या देवांचा उल्लेख केला जातो फारशी धर्मामध्ये अग्नि आणि पाणी या दोन तत्त्वांना अत्यंत महत्त्व आहे. त्यांच्या देवळामध्ये पवित्र अग्नी प्रज्वलित केलेला असतो त्या देवळांना अग्यारी असे म्हणतात .उत्तम विचार उत्तम वाणी आणि उत्तम कृती ही तीन प्रमुख आचरण तत्त्वे हा फारशी विचारसरणीचा गाभा आहे. देशामध्ये फारशी धर्मियांची संख्या ही खूप कमी आहे. वास्तविक भारतामध्ये उद्योगधंद्यांना मोठ्या प्रमाणात चालना देण्याचे काम हे स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरही फारशी धर्मियांनी केलेले आहे. त्यांनीच भारतातील सुधारणा चळवळींमध्येही मोठे योगदान दिलेले आहे. जमशेदजी टाटा सारखे उद्योजक या समाजा मधूनच पुढे आले आहेत. पारशी समाजातील सुधारकांनी शिक्षण संस्था आणि सामाजिक संस्था यांच्या उभारणीमध्ये मोठे योगदान दिलेले आहे.

लोकसंख्या[संपादन]

देश लोकसंख्या[२]
भारत ध्वज भारत ६९,०००
इराण ध्वज इराण २०,०००
Flag of the United States अमेरिका ११,०००
अफगाणिस्तान ध्वज अफगाणिस्तान १०,०००
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम ६,०००
कॅनडा ध्वज कॅनडा ५,०००
पाकिस्तान ध्वज पाकिस्तान ५,०००
सिंगापूर ध्वज सिंगापूर ४,५००
अझरबैजान ध्वज अझरबैजान २,०००
ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया २,७००
इराणचे आखात २,२००
न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड २,०००
एकूण १,३७,४००

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]