Jump to content

बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बेटी बचाओ या पानावरून पुनर्निर्देशित)

बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना ही एक भारत सरकारची योजना आहे. भारतातील बाललिंगगुणोत्तर २०११ मधील अंतिम सुधारित आकडेवारीनुसार ९१८ झाले आहे . त्यामुळे मुलींच्या निभावासाठी ,संरक्षणासाठी व सबलीकरणासाठी २२ जानेवारी २०१५ला बेटी बचाओ , बेटी पढाओ अभियानाला सुरुवात झाली , हे अभियान संपूर्ण देशात राबविले जात असून १६१ निवडक जिल्ह्यामध्ये बहुक्षेत्रीय कृतीतून राबविले जात आहे . या अभियानासाठी महिला कुस्तीगीर साक्षी मलिक हीला सदिच्छा दूत म्हणून निवडले आहे . महिला कल्याण योजनांसंबंधी समाजात जागरूकता निर्माण करणे हा या योजनेचा उद्देश आहे. जनगणनेच्या माहितीनुसार, भारतात, सन २०११ मध्ये, लहान मुलांचे लिंगोत्तर प्रमाण (० ते ६ वर्षे) १००० मुलांमागे ९२७ मुली असे होते. हरियाणातील बाललिंगगुणोत्तर सर्वात कमी (८३४) असल्यामुळे हे अभियान हरियाणातील पानिपतमधून सुरू करण्यात आले , १०० निवडक जिल्ह्यामध्ये हरियाणातील १२ , महाराष्ट्रातील १०(बीड,जळगाव,अहमदनगर,बुलढाणा ,औरंगाबाद,वाशीम,कोल्हापूर,उस्मानाबाद,सांगली,व जालना)पंजाबमधील ११,उत्तरप्रदेशातील १०,व जम्मू काश्मीरमधील ५ जिल्ह्यामध्ये ही योजना सुरू झाली. दुसऱ्या टप्प्यात आता ६१ जिल्हे जोडले आहेत यात गुजरातमधील ४ , हरियाणातील ८ , हिमाचल प्रदेशातील २,जम्मू काश्मीरमधील १०, मध्यप्रदेशातील २ , महाराष्ट्रातील (हिंगोली,सोलापूर पुणे,परभणी,नाशिक,लातूर) दिल्लीतील २ , पंजाबमधील ९,राजस्थानमधील ४,उत्तरप्रदेशातील ११, व उत्तराखंडमधील ३ जिल्ह्यांचा समावेश आहे. हे जिल्हे म्हणजे भारताच्या सरासरी बाललिंगगुणोत्तरापेक्षा कमी बाललिंगगुणोत्तर असलेले जिल्हे आणि किंवा सरासरीपेक्षा जास्त परंतु घट येत असलेले जिल्हे किंवा काही निवड जिल्हे असतात . युनिसेफने, सन २०१२ मध्ये, एका अहवालानुसार, या बाबतीत १९५ देशांमध्ये भारतास ४१वा क्रमांक दिला होता.[][]

या योजनेची सुरुवात ऑक्टोबर २०१४ मध्ये झाली. या योजनेत महिला व बालविकास मंत्रालय आणि आरोग्य व कुटुंब कल्याण यांचे एकत्रित सहकार्य आहे.[]

अभियानाची उद्दिष्टे :-

१) पक्षपाती लिंगनिवडीच्या प्रक्रियेचे उन्मूलन करणे

२) मुलींचे अस्तित्त्व व संरक्षण सुनिश्चित करणे

३) मुलींचे शिक्षण व सहभाग सुनिश्चित करणे .

लक्ष्यगट :-

१) प्राथमिक - तरुण व नुकतीच लग्न झालेले जोडपे,गरोदर व स्तनदा माता , आई -वडील

२) दुय्य्म- तरुण ,किशोर, डॉक्टर्स ,दवाखाने ,निदान केंद्रे

३) तृतीय- इतर सामाजिक घटक

योजनेचे लक्ष्य -

१) जन्मावेळचे लींगगुणोत्तरात वार्षिक १० ने बी=वाढ करणे

२) मुलांच्या व मुलींच्या बालमृत्युदरातील तफावत जी २०११ मध्ये ८ होती ती २०१७ पर्यंत ४ करणे

३) मुलींमधील रक्तक्षय व कुपोषण निम्मे करणे

४) माध्यमिक शाळातील मुलींच्या पटनोंदणीचे प्रमाण जे २०१३- १४ मध्ये ७६% होते ते २०१७ पर्यंत ७९% करणे

५) २०१७ पर्यंत प्रत्येक शाळेत मुलींसाठी शौचालये उभारणे .

६) २०१२ च्या बाललैंगिक शोषण संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करून मुलींसाठी संरक्षित वातावरण निर्माण करणे.

७) 'बेटी बचाओ ,बेटी पढाओ ' अभियानासाठी जनजागृती करून मुलींसाठी संरक्षित वातावरण निर्माण  करणे .

अंमल बजावणी

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "बेटी बचाओ बेटी पठाओ अभियान" (PDF). Wayback Machine. रोजी मूळ पानापासून संग्रहित2014-11-05. 2018-09-25 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "UP govt sounds alert over Beti Bachao Beti Padhao scheme fraud". https://www.hindustantimes.com/ (इंग्रजी भाषेत). 2017-05-19. 2018-09-25 रोजी पाहिले. External link in |work= (सहाय्य)
  3. ^ "PM Narendra Modi to launch 'Beti Bachao, Beti Padhao' programme from Haryana". The Economic Times. 2014-12-31. 2018-09-25 रोजी पाहिले.