Jump to content

बाराबती स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बारबती स्टेडियम या पानावरून पुनर्निर्देशित)
बाराबती स्टेडियम
मैदान माहिती
स्थान कटक, ओडिशा
स्थापना १९५८
आसनक्षमता ४५,०००
मालक ओडिशा क्रिकेट असोसिएशन
प्रचालक ओडिशा क्रिकेट असोसिएशन
यजमान ओडिशा क्रिकेट संघ (१९५८-सद्य)
ओडिशा फुटबॉल संघ (१९५८-सद्य)
डेक्कन चार्जर्स (२०१०-२०१२)
किंग्स XI पंजाब (२०१४)
कोलकाता नाईट रायडर्स (२०१४)

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम क.सा. ४-७ जानेवारी १९८७:
भारत  वि. श्रीलंका
अंतिम क.सा. ८-१२ नोव्हेंबर १९९५:
भारत  वि. न्यूझीलंड
प्रथम ए.सा. २७ जानेवारी १९८२:
भारत वि. इंग्लंड
अंतिम ए.सा. १९ जानेवारी २०१७:
भारत वि. इंग्लंड
एकमेव २०-२० ५ ऑक्टोबर २०१५:
भारत वि. दक्षिण आफ्रिका
शेवटचा बदल २० जानेवारी २०१७
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

बाराबती मैदान हे कटक, ओरिसा येथील एक खेळाचे मैदान आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी हे नियमित ठिकाण आहे आणि ओडिशा क्रिकेट संघाचे हे होम ग्राऊंड आहे. सदर मैदान ओडिशा क्रिकेट असोसिएशनच्या मालकीचे असून मैदानाच्या सर्व कारभाराची जबाबदारी त्यांच्यावरच आहे. त्याशिवाय हे मैदान फुटबॉलसाठीही वापरले जाते. मैदानावर संतोष चषक ही राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आणि ओडिशा पहिली विभागीय लीग फुटबॉल स्पर्धा खेळवली जाते. [] भारतामधील सर्वात जुन्या क्रिकेट मैदानांपैकी एक असलेल्या बाराबती स्टेडियममध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जाण्याआधी एमसीसी, वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलियायी संघांचे सराव सामने झाले आहेत.

क्रिकेट आणि फुटबॉलच्या मैदानावर दिवस-रात्र सामन्यांसाठी प्रकाशझोतांची व्यवस्था आहे.

इतिहास

[संपादन]

बाराबती मैदान कटक []येथे देशातील तिसरा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना २७ जानेवारी १९८२ रोजी खेळवला गेला, ज्यामध्ये भारताने इंग्लंडला हरवून मालिकेत २-१ असे यश मिळवले. पाच मोसमांनंतर मैदानावर पहिला कसोटी सामना खेळवला गेला, ज्यामध्ये अंदाज करता न येण्याइतकी उसळी मिळणाऱ्या, काम पुर्णपणे न झालेल्या खेळपट्टीने श्रीलंकेच्या संघाचे स्वागत केले. दिलीप वेंगसरकर, त्यावेळी आपल्या यशाच्या अत्त्युच्च शिखरावर होता, त्याने त्याची कसोटी क्रिकेटमधील १६६ धावांची सर्वोत्तम खेळी केली. सामन्यात दोन्ही संघांमधील इतर कुणालाही ६० पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. श्रीलंकेचा दोनवेळा सर्वबाद करून भारताने १ डाव आणि ६७ धावांनी विजय मिळवला. कपिल देवने त्याचा ३००वा बळी ह्याच सामन्यात रुमेश रत्नायकेच्या रूपाने मिळवला.

१९९५-९६ मध्ये न्यू झीलंडविरुद्ध ह्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या एकमेव कसोटी सामन्यावर पावसाचा खूप वाईट परिणाम झाला. सामन्यात केवळ १७७.५ षटकांचा खेळ होऊ शकला. पुनरागमन करणाऱ्या नरेंद्र हिरवाणीने न्यू झीलंडचा एकमेव डावात ५९ धावांमध्ये ६ बळी घेऊन ह्या मैदानावरील सर्वोत्तम गोलंदाजीची नोंद केली.

ह्या मैदानावर कसोटी सामने आता नियमित होत नसले तरीही त्याला आंतरराष्ट्रीय दर्जा आहे आणि येथे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने नियमित पणे होतात. दोन कसोटी सामन्यांतून भारताने एक कसोटी जिंकली आहे. तर, १७ एकदिवसीय सामन्यांपैकी ११ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. मैदानावर रिलायन्स विश्वचषक स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया विरुद्ध झिम्बाब्वे आणि नेहरू चषक, १९८९ स्पर्धेतील इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान हे सामने खेळवले गेले आहेत. त्याशिवाय बाराबती स्टेडियममध्ये १९९६ विश्वचषक क्रिकेट स्पर्धांतील काही सामने खेळवले गेले होते.

२०१२ मध्ये, ओडिशा क्रिकेट असोसिएशनने बाराबती मैदानावरील इनडोअर हॉलला सचिन तेंडुलकरचे नाव दिले.

आकडेवारी आणि विक्रम

[संपादन]
प्रकार कसोटी एकदिवसीय टी२०
सर्वात मोठी धावसंख्या भारतचा ध्वज भारत ४०० वि श्रीलंका भारतचा ध्वज भारत ३८१/६ वि इंग्लंड दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ९६/४ वि भारत
सर्वात लहान धावसंख्या श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १४२ वि भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १४८/९ वि इंग्लंड भारतचा ध्वज भारत ९२ वि दक्षिण आफ्रिका
सर्वोत्कृष्ट फलंदाजी भारत दिलीप वेंगसरकर १६६ वि श्रीलंका भारत मोहम्मद अझरुद्दीन १५३* वि झिम्बाब्वे दक्षिण आफ्रिका जेपी ड्युमिनी ३०* वि भारत
सर्वोत्कृष्ट गोलंदाजी भारत नरेंद्र हिरवाणी ६/५९ वि न्यूझीलंड वेस्ट इंडीज डॅरेन पॉवेल ४/२७ वि भारत दक्षिण आफ्रिका अल्बी मॉर्केल ३/१२ वि भारत
सर्वात मोठी भागीदारी भारत दिलीप वेंगसरकरकपिल देव १११ वि श्रीलंका भारत मोहम्मद अझरुद्दीनअजय जडेजा २७५* वि झिम्बाब्वे भारत रोहित शर्माशिखर धवन २८ वि दक्षिण आफ्रिका
सर्वाधिक धावा भारत दिलीप वेंगसरकर १६६ भारत सचिन तेंडूलकर ४६९ दक्षिण आफ्रिका जेपी ड्युमिनी ३०
सर्वाधिक बळी भारत नरेंद्र हिरवाणी
भारत मनिंदरसिंग
भारत अनिल कुंबळे
भारत इशांत शर्मा
भारत अजित आगरकर
दक्षिण आफ्रिका अल्बी मॉर्केल
भारत रविचंद्रन अश्विन
  • श्रीलंकेविरुद्ध २ नोव्हेंबर २०१४ रोजी अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन यांनी २३१ धावांची सलामी दिली, जी आतापर्यंतची भारतातर्फे १ल्या गड्यासाठी तिसरी सर्वोत्तम भागीदारी आहे.[]

आंतरराष्ट्रीय सामन्यांची यादी

[संपादन]

कसोटी

[संपादन]

आजवर मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[]:

दिनांक संघ १ संघ २ विजयी संघ फरक धावफलक
४-७ जानेवारी १९८७ भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारतचा ध्वज भारत १ डाव आणि ६७ धावा धावफलक
८-१२ नोव्हेंबर १९९५ भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड अनिर्णित धावफलक

एकदिवसीय

[संपादन]

आजवर मैदानावर झालेल्या एकदिवसीय सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[]:

दिनांक संघ १ संघ २ विजयी संघ फरक धावफलक
२७ जानेवारी १९८२ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत ५ गडी धावफलक
२७ डिसेंबर १९८४ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ धाव धावफलक
३० ऑक्टोबर १९८७ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७० धावा धावफलक
१२ डिसेंबर १९८८ भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड भारतचा ध्वज भारत ५ गडी धावफलक
२२ ऑक्टोबर १९८९ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४ गडी धावफलक
२८ डिसेंबर १९९० भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ३६ धावा धावफलक
९ नोव्हेंबर १९९४ भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारतचा ध्वज भारत ८ गडी धावफलक
१८ फेब्रुवारी १९९६ भारतचा ध्वज भारत केन्याचा ध्वज केन्या भारतचा ध्वज भारत ७ गडी धावफलक
२७ ऑक्टोबर १९९६ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया रद्द धावफलक
९ एप्रिल १९९८ भारतचा ध्वज भारत झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे भारतचा ध्वज भारत ३२ धावा धावफलक
२ डिसेंबर २००० भारतचा ध्वज भारत झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे भारतचा ध्वज भारत ३ गडी धावफलक
२२ जानेवारी २००२ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १६ धावा धावफलक
६ नोव्हेंबर २००३ भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४ गडी धावफलक
२४ जानेवारी २००७ भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारतचा ध्वज भारत २० धावा धावफलक
२६ नोव्हेंबर २००८ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत ६ गडी धावफलक
२१ डिसेंबर २००९ भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारतचा ध्वज भारत ७ गडी धावफलक
२९ नोव्हेंबर २०११ भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारतचा ध्वज भारत १ गडी धावफलक
२६ ऑक्टोबर २०१३ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया रद्द धावफलक
२ नोव्हेंबर २०१४ भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारतचा ध्वज भारत १६९ धावा धावफलक
१९ जानेवारी २०१७ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत १५ धावा धावफलक

टी२०

[संपादन]

आजवर मैदानावर झालेल्या टी२० सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[]:

दिनांक संघ १ संघ २ विजयी संघ फरक धावफलक
५ ऑक्टोबर २०१५ भारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ६ गडी धावफलक

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ ओरिस्पोर्ट्स.कॉम वेळापत्रक
  2. ^ "बाराबती स्टेडियमविषयी तुम्हाला हे माहीत आहे काय? | Do you know about Barabati Stadium?". kheliyad (इंग्रजी भाषेत). 2021-03-10. 2021-03-28 रोजी पाहिले.
  3. ^ "नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / भागीदारीतील नोंदी / १ल्या गड्यासाठी सर्वोत्तम भागीदारी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  4. ^ "बाराबती स्टेडियम, कटक / नोंदी / एकदिवसीय सामने / सामने निकाल" (इंग्रजी भाषेत). २६ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  5. ^ "बाराबती स्टेडियम, कटक / नोंदी / एकदिवसीय सामने / सामने निकाल" (इंग्रजी भाषेत). २६ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
  6. ^ "बाराबती स्टेडियम, कटक / नोंदी / टी२० सामने / सामने निकाल" (इंग्रजी भाषेत). २६ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.