Jump to content

पी. सदाशिवम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पी. सथाशिवम या पानावरून पुनर्निर्देशित)
पी. सदाशिवम्
न्या. पी. सदाशिवम्
नागरिकत्व भारतीय
शिक्षण शासकीय विधी महाविद्यालय, चेन्नई
कार्यकाळ १९ जुलै २०१३ ते २६ एप्रिल २०१४

पलानिसमय सदाशिवम् (जन्म २७ एप्रिल १९४९) हे भारताचे माजी सरन्यायाधीश आहेत. त्यांनी अल्तमश कबीर यांच्यानंतर १९ जुलै, इ.स. २०१३ रोजी कार्यभार स्वीकारला.[] ते भारतचे चाळिसावे व तामिळनाडूतील दुसरे सरन्यायधीश आहेत.[]. २०१४पासून ते केरळचे राज्यपाल आहेत. सरन्यायाधीशपदावरून निवृत्त झाल्यानंतर एखाद्या राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झालेले ते पहिले सरन्यायाधीश आहेत.

पूर्वायूष्य व शिक्षण

[संपादन]

सदाशिवम् यांचा जन्मईरोडे जिल्ह्यातील भवनी जवळील कडप्पनल्लूर या गावी एका शेतकरी कुटूंबात झाला.पलानिसमय व नात्चीम्मल हे त्यांचे आईवडील.त्यांनी शासकिइय विधी महाविद्यालय, चेन्नई येथून पदवी संपादित केली. बी.ए. पदवी मिळवल्यानंतर ते त्यांच्या कुटूंबातील व गावातील पहीले पदवीधर बनले.[]

करकीर्द

[संपादन]

सदाशिवम् यांनी २५ जुलै १९७३ रोजी वकील म्हणून मद्रास न्यायालयात कारकिर्दीला सुरुवात केली.त्यानंतर त्यांची अतिरिक्त सरकारी वकील व नंतर विषेश सरकारी वकील म्हणून मद्रास उच्च न्यायालयात नेमणूक करण्यात आली.त्यांनी काही सरकारी संस्था,बँका यांना न्यायसल्लागार म्हणूनही काम केले.त्यांची ८ जुलै १९९६ रोजी मद्रास उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यात आली, नंतर त्यांना २० एप्रिल २००७ रोजी [पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात पाठवण्यात आले.२१ ऑगस्ट २००७ रोजी त्यांना सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणून बढती मिळाली.[]

महत्त्वपूर्ण निर्णय

[संपादन]

न्या. सदाशिवम् यांनी परंपरेला छेद देणारे अनेक निर्णय घेतले.

  • मे २०१०चा रिलायन्स गॅस निर्णय हा त्यांपैकीच एक.यात त्यांनी नैसर्गिक स्त्रोतांचा जनतेसाठी उपयोग करण्यासाठी भर दिला.“आपल्यासारख्या लोकशाही राष्ट्रात नैसर्गिक संपत्ती सर्व जनतेच्या मालकीची असते” आणि “शासनाकडे त्यांचा लोकहितासाठी वापर करावा यासाठी मालकी असते” असे त्यांनी प्रतिपादन केले.[]
  • १९९३ च्या मुंबई बॉंबस्फोट खटल्यात संजय दत्तला शिक्षा देणे.[] According to J. Venkatesan, writing in द हिंदू, "In a number of judgements, he [Sathasivam] cautioned the courts against awarding lesser sentence in crimes against women and children and showing undue sympathy towards the accused by altering the sentence to the extent of period already undergone."[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Appointed as The Chief Justice of India in the forenoon of 19.07.2013".
  2. ^ a b c Venkatesan, J. (29 June 2013). "Justice Sathasivam, who convicted Sanjay Dutt, to become CJI". द हिंदू. 1 July 2013 रोजी पाहिले.
  3. ^ "P. Sathasivam to be New Chief Justice of India". Outlook. 29 June 2013. 2013-07-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 July 2013 रोजी पाहिले.
  4. ^ Mahapatra, Dhananjay (30 June 2013). "Justice Sathasivam to take over as new CJI on July 19". टाइम्स ऑफ इंडिया. 2 July 2013 रोजी पाहिले.
  5. ^ "RNRL vs RIL" (pdf). legallyindia.com. 23 July 2013 रोजी पाहिले.
  6. ^ "HAF Writes to Justices of Indian Supreme Court about Dara Singh Case | Hindu American Foundation (HAF)". Hafsite.org. 2014-01-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-02-10 रोजी पाहिले.
  7. ^ "Manu Sharma vs State (NCT of Delhi)". judis.nic.in. 2014-12-09 रोजी मूळ पान (pdf) पासून संग्रहित. 23 July 2013 रोजी पाहिले.