निक मॅडिन्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
निक मॅडिन्सन
Nic Maddinson.jpg
Flag of Australia.svg ऑस्ट्रेलिया
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव निकोलस जेम्स मॅडिन्सन
जन्म २१ डिसेंबर, १९९१ (1991-12-21) (वय: २८)
नॉव्रा, न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया,भारत
उंची ६ फु १ इं (१.८५ मी)
विशेषता सलामीवीर फलंदाज
फलंदाजीची पद्धत डावखोरा
गोलंदाजीची पद्धत धीमा डावखोरा ऑर्थोडॉक्स
आंतरराष्ट्रीय माहिती
क.सा. पदार्पण (४४८) २४ नोव्हेंबर २०१६: वि दक्षिण आफ्रिका
२०-२० पदार्पण (५३) १० ऑक्टोबर २०१३ वि भारत
शेवटचा २०-२० ९ नोव्हेंबर २०१४ वि दक्षिण आफ्रिका
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२०१०-सद्य न्यू साउथ वेल्स (संघ क्र. ५३)
२०११-सद्य सिडनी सिक्सर्स (संघ क्र. ५३)
२०१४-सद्य रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
कारकिर्दी माहिती
कसोटीटी२०प्र.श्रे.लिस्ट अ
सामने ६० ६०
धावा ३८ ३६५३ १९२६
फलंदाजीची सरासरी ०.०० १९.०० ३७.२७ ३५.०१
शतके/अर्धशतके ०/० ०/० ८/१७ ४/१०
सर्वोच्च धावसंख्या ३४ १८१ ११८*
चेंडू - - २७४ ३३०
बळी - -
गोलंदाजीची सरासरी - - ३५.०० २७६.०
एका डावात ५ बळी - -
एका सामन्यात १० बळी - -
सर्वोत्तम गोलंदाजी - - २/१० १/३६
झेल/यष्टीचीत ०/- ०/- ४२/- ३०/-

२८ नोव्हेंबर, इ.स. २०१६
दुवा: [निक मॅडिन्सन क्रिकइन्फो वर] (इंग्लिश मजकूर)

निकोलस जेम्स मॅडिन्सन हा एक ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू आहे. तो डावखोरा सलामीवीर असून ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक क्रिकेटमधील न्यू साउथ वेल्स ब्ल्यूज आणि केएफसी टी२० बिग बॅश लीग मध्ये सिडनी सिक्सर्स ह्या संघाकडून खेळतो.

१९ वर्षांखालील संघ[संपादन]

साउथ कोस्ट मध्ये जन्मलेला, मॅडिसन डिसेंबर २००९ साली ऑस्ट्रेलिया १९ वर्षांखालील चॅंपियनशीप जिंकलेल्या १९-वर्षांखालील न्यू साउथ वेल्स संघाचा एक सदस्य होता.

त्याच्या दोनच महिने अगोदर श्रीलंका १९-वर्षांखालील संघाविरुद्ध खेळताना त्याने ऑस्ट्रेलियातर्फे घरच्या मालिकेमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाजी सरासरीचा विक्रम केला. मालिकेत त्याची सरासरी होती ७१.६६[१] आणि डार्विन मधील ५०-षटकांच्या सामन्यात त्याने प्रत्येक चेंडूस एक धाव अशा नाबाद १३३ धावा केल्या.[२]

मॅडिन्सनच्या ह्या कामगिरीमुळे जानेवारी २०१० मध्ये, न्यूझीलंड येथे खेळवल्या गेलेल्या, आयसीसी १९-वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या ऑस्ट्रेलिया १९-वर्षांखालील संघात त्याचा समावेश झाला. स्पर्धेमध्ये लिंकन येथील अंतिम सामन्यात त्याने डावाची सुरवात केली. सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा २५ धावांनी पराभव केला आणि चषकावर आपले नाव कोरले. [३]

स्थानिक कामगिरी[संपादन]

२००९-१० मधील सथरलॅंड डिस्ट्रीक्ट क्रिकेट क्लब सोबतचा मोसम सुद्धा मॅडिन्सनसाठी खूपच फलदायी होता, ह्यावेळी त्याने ४३.६० च्या सरासरीने ७४१ धावा कुटल्या. [४] मोसमात दोन शतके झळकावली, त्यामधील इस्टर्न सबर्ब्स विरुद्ध केलेल्या १३७ धावा खूपच महत्त्वपुर्ण ठरल्या त्यामुळे संघाला अंतिम फेरीत धडक मारता आली.

त्याच्या डावखोर्‍या ऑर्थोडॉक्स फिरकी गोलंदाजीने त्या वर्षातील फर्स्ट ग्रेड णी सामन्यात १२ बळी घेतले, ज्यामध्ये इस्ट विरुद्ध ५-९५ ह्या सामना जिंकून देणार्‍या कामगिरीचा समावेश होता.

११ ऑक्टोबर २०११ रोजी न्यू साउथ वेल्स कडून त्याने शतक झळकावले आणि प्रथम श्रेणी सामन्यातील पदार्पणात शतक झळकावणारा तो सर्वात लहान खेळाडू ठरला. तो १८ वर्षे आणि २९४ दिवसांचा असताना त्याने दक्षिण ऑस्ट्रेलियाविरुद्ध ११३ धावा केल्या. ह्या आधीचा विक्रम महान आर्थर मॉरिसच्या नावावर होता त्याने २६ डिसेंबर १०४९ रोजी तो १८ वर्षे आणि ३४२ दिवस वयाचा असताना १४८ धावा केल्या होत्या. तसेच तो न्यूसाउथ वेल्सकडून शतक झळकावणारा चवथा सर्वात लहान खेळाडू ठरला, त्याच्यापेक्षा लहान फलंदाजांमध्ये आर्ची जॅक्सन, इयान क्रेग, डग वॉल्टर यांचा समावेश आहे. जून-जुलै २०११ मध्ये व्हीबी टूरसाठी झिम्बाब्वेच्या दौर्‍यावर गेलेल्या ऑस्ट्रेलिया अ च्या एकदिवसीय आणि चार दिवसीय अशा दोन्ही संघात त्याची निवड झाली होती. दौर्‍यावर झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश असलेली व्हीबी त्रिकोणी मालिका आणि त्यानंतर यजमानांविरुद्ध दोन चार-दिवसीय सामने खेळवले गेले.

आयपीएल[संपादन]

२०१४ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाकडून मॅडिन्सन ने आयपीएल पदार्पण केले. बंगलोरकडून डावाची सुरवात करताना त्याने दिल्ली आणि मुंबई विरुद्ध अनुक्रमे ४ आणि १२ धावा केल्या. त्यानंतर दुखापतीमुळे त्याला संघाबाहेर बसावे लागले. [५]

बिग बॅश[संपादन]

२०१४/१५ केएफसी टी२० बीग बॅश लीगच्या अंतिम सामन्यात, मॅडिन्सनचा सिडनी सिक्सर्स संघ शेवटच्या चेंडूवर पर्थ स्कॉर्चर्सविरुद्ध हरला. मॅडिन्सनने दोन चौकारांसहीत २२ चेंडूंमध्ये १९ धावा केल्या. शेवटचा चेंडू मॅडिन्सनने पकडला आणि कर्णधार हेन्रिक्सकडे अचुक फेकला, परंतू त्याला तो पकडता आला नाही आणि अराफातला धावचीत करण्याची संधी गमावली, त्यामुळे सामना सुपर ओव्हर पर्यंत गेला.

२०१४/१५ केएफसी टी२० बीग बॅश लीगमध्ये सिडनी सिक्सर्सचा कर्णधार मोझेस हेन्रीक्सला जेव्हा दुखापतीमुळे संघाबाहेर बसावे लागले तेव्हा त्याच्याऐवजी मॅडिन्सनने कर्णधारपदाची धुरा सांभाळली.[६]

आंतरराष्ट्रीय कामगिरी[संपादन]

ऑक्टोबर २०१३ मध्ये राजकोट येथे भारताविरुद्ध मॅडिन्सनने ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले. त्याने १६ चेंडू ३४ धावा केल्या.[७]नोव्हेंबर २०१४ मध्ये, सिडनीमधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या त्याच्या दुसर्‍या टी२० सामन्यात तो अवघ्या ४ धावा करु शकला.[८]

नोव्हेंबर २०१६ मध्ये, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसर्‍या कसोटीसाठी मॅडिन्सनची ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात निवड करण्यात आली. [९] त्याने त्याचे कसोटी पदार्पण २४ नोव्हेंबर २०१६ रोजी केले. [१०] त्याच्या पहिल्या कसोटी डावामध्ये १२ व्या चेंडूवर कागिसो रबाडाने त्याला शून्य धावांवर त्रिफळाचीत केले, त्याचा दुसरा पदार्पण करणारा सहकारी पीटर हॅंड्सकोंबने मात्र ७८ चेंडूंमध्ये ५४ धावा केल्या.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "नोंदी / श्रीलंका १९-वर्षांखालील संघाची ऑस्ट्रेलियामधील युवा एकदिवसीय मालिका, २००९/१० – ऑस्ट्रेलिया १९-वर्षांखालील (युवा क्रिकेटपटू) / फलंदाजी आणि गोलंदाजी सरासरी" (इंग्रजी भाषेत). २८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "श्रीलंका १९-वर्षांखालील संघाची ऑस्ट्रेलियामधील युवा एकदिवसीय मालिका, २रा सामना, डार्विन, ४ ऑक्टोबर २००९" (इंग्रजी भाषेत). २८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  3. ^ "आयसीसी १९-वर्षांखालील विश्वचषक, ४८वा सामना, अंतिम: ऑस्ट्रेलिया वि पाकिस्तान, लिंकन, ३० जानेवारी २०१०" (इंग्रजी भाषेत). २८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  4. ^ खेळाडू मोसम आकडेवारी, २००९/२०१०, निक मॅडिन्सन
  5. ^ क्रिकइन्फो कर्मचारी. "कल्टर-नील, मॅडिन्सन आयपीएल मधून बाहेर" (इंग्रजी भाषेत). २९ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  6. ^ "सिडनी सिक्सर्सचा युवा खेळाडू निक मॅडिन्स्न दुखापतग्रस्त मोझेस हेन्रिक्स ऐवजी कर्णधार" (इंग्रजी भाषेत). २९ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  7. ^ "धावफलक: एकमेव टी२०आं: भारत वि. ऑस्ट्रेलिया, राजकोट, १० ऑक्टोबर २०१३". २९ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  8. ^ "धावफलक: ३रा टी२०आं: ऑस्ट्रेलिया वि दक्षिण आफ्रिका, स्टेडियम ऑस्ट्रेलिया, ९ नोव्हेंबर २०१४". २९ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  9. ^ "रेन्शॉ, मॅडिन्सन, हॅंड्सकोंब कसोटी पदार्पण करणार". इएसपीएन क्रिकइन्फो. २९ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
  10. ^ "दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलिया दौरा, ३री कसोटी: ऑस्ट्रेलिया वि दक्षिण आफ्रिका, ॲडलेड, २४-२८ नोव्हेंबर २०१६". इएसपीएन क्रिकइन्फो. २९ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.


बाह्यदुवे[संपादन]