चॅपेल-हॅडली चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
चॅपेल-हॅडली चषक
आयोजक आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
प्रकार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने
प्रथम २००४-०५
शेवटची २०१६-१७
स्पर्धा प्रकार मालिका
संघ
सद्य विजेता न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
यशस्वी संघ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (५)
सर्वाधिक धावा न्यूझीलंड ब्रॅंडन मॅककुलम (८०९)
ऑस्ट्रेलिया मायकल हसी (७३६)
ऑस्ट्रेलिया ब्रॅड हॅडीन (६९२) [१]
सर्वाधिक बळी ऑस्ट्रेलिया मिचेल जॉन्सन (२६)
न्यूझीलंड ट्रेंट बोल्ट (२३)
न्यूझीलंड डॅनिएल व्हेट्टोरी (२२)[२]

चॅपेल-हॅडली चषक ही ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड संघांदरम्यान खेळवली जाणारी एकदिवसीय मालिका आहे. ऑस्ट्रेलियाचे चॅपेल बंधू (इयान, ग्रेगरी आणि ट्रेव्हर) आणि न्यू झीलंडचे वॉल्टर हॅडली आणि त्यांची तीन मुले (बॅरी, डेल आणि सर रिचर्ड) ह्या दोन देशांच्या प्रख्यात कुटुंबांच्या नावावरून सदर मालिकेला नाव दिले गेले आहे.

चॅपेल-हॅडली चषक, २०१६ मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाला २-१ असे पराभूत केल्यानंतर, सध्या हा चषक न्यू झीलंडकडे आहे.[३]२०१५ क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यात हे दोन्ही संघ आमने-सामने आले होते, तो सामना चॅपेल-हॅडली चषकासाठी विचारात घेतला गेला नाही (परंतू, गट फेरीतील सामना ग्राह्य धरला गेला आणि त्यामुळे २०१४-१५ चषकाचा विजेता सुद्धा न्यू झीलंड संघ ठरला).[४] ह्याआधी, २००७-०८ पासून सदर चषक सतत ऑस्ट्रेलियाकडेच होता.[५] ऑस्ट्रेलियाने पाच तर न्यू झीलंडने आतापर्यंतर चार मालिका जिंकल्या आहेत.[६]

२००४-०५ पासून २००९-१० पर्यंत चषकासाठी दर वर्षी तीन किंवा पाच सामन्यांची मालिका होत असे आणि २०१०-११ आणि २०१४-१५ विश्वचषकादरम्यान एका सामन्यांच्या मालिकेची नोंद केली गेली. परंतु सध्या सदर मालिका ही वार्षिक स्पर्धा राहिलेली नाही. क्रिकेट विश्वचषक, २०१५ - अंतिम सामना हा ह्या दोन संघांदरम्यान खेळवला गेला, परंतु तो सामना ह्या चषकासाठी ग्राह्य धरला गेला नाही.[७] २०१७-१८ मोसमातील मालिकेऐवजी ट्रान्स-टस्मान त्रिकोणी मालिका, २०१७-१८ खेळवण्यात येईल, परंतु २०१८-१९ मधील न्यू झीलंड मधील मालिका अपेक्षेप्रमाणे खेळवण्यात येईल.[८]

इतिहास[संपादन]

३ डिसेंबर २००५ च्या चॅपेल-हॅडली चषक सामन्यातील चित्र

चॅपेल-हॅडली चषक सामन्यांनी अनेक लक्षणीय निकाल आणि विक्रम मोडताना पाहिले आहेत:

 • न्यू झीलंडने चॅपेल-हॅडली चषक सामन्यांमध्ये तीन सर्वात मोठ्या धावसंख्यांचा यशस्वी पाठलाग केला आहे. २००५-०६ च्या मालिकेमध्ये ख्राईस्टचर्च येथील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ३३२ धावांचा यशस्वी पाठलाग करून एकदिवसीय इतिहासातील सर्वात मोठ्या यशस्वी पाठलागाचा विक्रम स्थापित केला;[९] तो नंतर दक्षिण आफ्रिकेने २००५-०६ च्या मोसमात मोडला होता. त्यानंतर २००६-०७ च्या मालिकेमध्ये, न्यू झीलंडने ऑकलंड येथील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ३३६ तर हॅमिल्टन येथील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ३४६ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. सध्या हे विक्रम एकदिवसीय इतिहासात यशस्वी पाठलागांच्या यादीत पहिल्या दहा मध्ये आहेत.[१०]
 • २००६-०७ च्या वेलिंग्टन येथील पहिल्या एकदिवसीय सामन्यात, ऑस्ट्रेलियाला एकदिवसीय इतिहासात पहिल्यांदाच १० गड्यांनी पराभव पत्करावा लागला होता. तो ऑस्ट्रेलियाचा ६४६वा एकदिवसीय सामना होता.[११]
 • २००६-०७ मध्ये ऑकलंड येथील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर ऑस्ट्रेलियाला आयसीसी एकदिवसीय अजिंक्यपद स्पर्धेचे ऑक्टोबर २००२ मध्ये क्रमवारी अस्तित्वात आल्यानंतर मिळालेले अव्वल स्थान ५२ महिन्यांत पहिल्यांदाच गमवावे लागले.[१२]
 • २००६-०७ मधील हॅमिल्टन येथील एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना मॅथ्यू हेडनने नाबाद १८१ धावा करून ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजातर्फे सर्वोच्च वैयक्तिक धावांचा नवीन विक्रम प्रस्थापित केला,[१३] जो २०११ पर्यंत अबाधित होता. दुसऱ्या डावात क्रेग मॅकमिलनने ६७ चेंडूंमध्ये झंझावाती शतक ठोकले, हा न्यू झीलंड फलंदाजातर्फे एकदिवसीय सामन्यातील सर्वात जलद शतकाचा विक्रम होता.[१३] १ जानेवारी २०१४ रोजी कोरे ॲंडरसन (३६ चेंडूंत) आणि जेसी रायडर (४६ चेंडूंत) ह्या दोघांनी वेस्ट इंडीज विरुद्ध क्वीन्सटाऊन येथे हा विक्रम मोडला.

एकूण सांख्यिकी[संपादन]

मालिका[संपादन]

मालिका ऑस्ट्रेलिया न्यू झीलंड बरोबरी
११

सामने[संपादन]

सामने ऑस्ट्रेलिया न्यू झीलंड बरोबरी / अनिर्णित
३१ १५ १४

मालिका निकाल[संपादन]

मोसम यजमान निकाल मालिकावीर क्रिकइन्फो पान
२००४-०५ ऑस्ट्रेलिया मालिका बरोबरीत १-१ डॅनिएल व्हेट्टोरी [१]
२००५-०६ न्यू झीलंड ऑस्ट्रेलिया विजयी २-१ स्टुअर्ट क्लार्क [२]
२००६-०७ न्यू झीलंड न्यू झीलंड विजयी ३-० शेन बॉंड [३]
२००७-०८ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया विजयी २–० रिकी पॉंटिंग [४]
२००८-०९ ऑस्ट्रेलिया मालिका बरोबरीत २-२ मायकल हसी [५]
२००९-१० न्यू झीलंड ऑस्ट्रेलिया विजयी ३–२ मिचेल जॉन्सन/स्कॉट स्टायरिस [६]
२०११ भारत[१४] ऑस्ट्रेलिया विजयी १–० मिचेल जॉन्सन* [७]
२०१५ न्यू झीलंड न्यू झीलंड विजयी १–० ट्रेंट बोल्ट* [८]
२०१५-१६ न्यू झीलंड न्यू झीलंड विजयी २–१ मार्टिन गुप्टिल [९]
२०१६-१७ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया विजयी ३–० डेव्हिड वॉर्नर [१०]
२०१६-१७ न्यू झीलंड न्यू झीलंड विजयी २–१ [११]

*एकमेव एकदिवसीय सामन्यात सामनावीर पुरस्कार

मालिका[संपादन]

२००४-०५ मालिका, ऑस्ट्रेलिया[संपादन]

चॅपेल-हॅडली चषक, २००४-०५. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका निकाल: मालिका बरोबरीत १-१.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक ऑस्ट्रेलिया कर्णधार न्यू झीलंड कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. २१९६ ५ डिसेंबर २००४ रिकी पॉंटिंग स्टीफन फ्लेमिंग डॉकलॅंड्स स्टेडियम, मेलबर्न न्यू झीलंड ४ गडी राखून
ए.दि. २१९८ ८ डिसेंबर २००४ रिकी पॉंटिंग स्टीफन फ्लेमिंग सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलिया १७ धावांनी
ए.दि. २१९८अ १० डिसेंबर २००४ रिकी पॉंटिंग स्टीफन फ्लेमिंग द गब्बा, ब्रिस्बेन रद्द (पाऊस)

२००५-०६ मालिका, न्यू झीलंड[संपादन]

चॅपेल-हॅडली चषक, २००५-०६. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी २–१.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक न्यू झीलंड कर्णधार ऑस्ट्रेलिया कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. २३०१ ३ डिसेंबर २००५ डॅनिएल व्हेट्टोरी रिकी पॉंटिंग इडन पार्क, ऑकलंड ऑस्ट्रेलिया १४७ धावांनी
ए.दि. २३०२ ७ डिसेंबर २००५ डॅनिएल व्हेट्टोरी रिकी पॉंटिंग वेस्टपॅक मैदान, वेलिंग्टन ऑस्ट्रेलिया २ धावांनी
ए.दि. २३०३ १० डिसेंबर २००५ डॅनिएल व्हेट्टोरी रिकी पॉंटिंग जेड मैदान, ख्राईस्टचर्च न्यू झीलंड २ गडी राखून

२००६-०७ मालिका, न्यू झीलंड[संपादन]

चॅपेल-हॅडली चषक, २००६-०७. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका निकाल: न्यू झीलंड विजयी ३-०

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक न्यू झीलंड कर्णधार ऑस्ट्रेलिया कर्णधार स्थळ निकाल
ए. दि. २५२४ १६ फेब्रुवारी २००७ स्टीफन फ्लेमिंग मायकल हसी वेस्टपॅक मैदान, वेलिंग्टन न्यू झीलंड १० गडी राखून
ए. दि. २५२६ १८ फेब्रुवारी २००७ स्टीफन फ्लेमिंग मायकल हसी इडन पार्क, ऑकलंड न्यू झीलंड ५ गडी राखून
ए. दि. २५२७ २० फेब्रुवारी २००७ स्टीफन फ्लेमिंग मायकल हसी सेडन पार्क, हॅमिल्टन न्यू झीलंड १ गडी राखून

२००७-०८ मालिका, ऑस्ट्रेलिया[संपादन]

चॅपेल-हॅडली चषक, २००७-०८. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी २-०.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक न्यू झीलंड कर्णधार ऑस्ट्रेलिया कर्णधार स्थळ निकाल
ए. दि. २६५५ १४ डिसेंबर २००७ डॅनिएल व्हेट्टोरी रिकी पॉंटिंग ॲडलेड ओव्हल, ॲडलेड ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून
ए. दि. २६५६ १६ डिसेंबर २००७ डॅनिएल व्हेट्टोरी रिकी पॉंटिंग सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी अनिर्णित (पाऊस)
ए. दि. २६५७ २० डिसेंबर २००७ डॅनिएल व्हेट्टोरी रिकी पॉंटिंग बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट ऑस्ट्रेलिया १२० धावांनी

२००८-०९ मालिका, ऑस्ट्रेलिया[संपादन]

चॅपेल-हॅडली चषक, २००८-०९. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका निकाल: २-२ बरोबरीनंतर चषक ऑस्ट्रेलियाकडेच राहिला.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक न्यू झीलंड कर्णधार ऑस्ट्रेलिया कर्णधार स्थळ निकाल
ए. दि. २८११ १ फेब्रुवारी २००९ डॅनिएल व्हेट्टोरी रिकी पॉंटिंग वाका मैदान, पर्थ न्यू झीलंड २ गडी राखून
ए. दि. २८१६ ६ फेब्रुवारी २००९ डॅनिएल व्हेट्टोरी मायकेल क्लार्क मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न न्यू झीलंड ६ गडी राखून
ए. दि. २८१७ ८ फेब्रुवारी २००९ डॅनिएल व्हेट्टोरी रिकी पॉंटिंग सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलिया ३२ धावांनी
ए. दि. २८१९ ११ फेब्रुवारी २००९ डॅनिएल व्हेट्टोरी रिकी पॉंटिंग ॲडलेड ओव्हल, ॲडलेड ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून
ए. दि. २८२० १३ फेब्रुवारी २००९ डॅनिएल व्हेट्टोरी रिकी पॉंटिंग द गब्बा, ब्रिस्बेन अनिर्णित (पाऊस)

२००९-१० मालिका, न्यू झीलंड[संपादन]

चॅपेल-हॅडली चषक, २००९-१०. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी ३–२.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक न्यू झीलंड कर्णधार ऑस्ट्रेलिया कर्णधार सामनावीर स्थळ निकाल
ए. दि. २९६६ ३ मार्च २०१० रॉस टेलर रिकी पॉंटिंग रॉस टेलर मॅकलीन पार्क, नेपियर न्यू झीलंड २ गडी राखून
ए. दि. २९६९ ६ मार्च २०१० डॅनिएल व्हेट्टोरी रिकी पॉंटिंग डॅनिएल व्हेट्टोरी इडन पार्क, ऑकलंड ऑस्ट्रेलिया १२ धावांनी
ए. दि. २९७१ ९ मार्च २०१० डॅनिएल व्हेट्टोरी रिकी पॉंटिंग ब्रॅड हॅडिन सेडन पार्क, हॅमिल्टन ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून
ए. दि. २९७३ ११ मार्च २०१० डॅनिएल व्हेट्टोरी रिकी पॉंटिंग कॅमेरोन व्हाइट इडन पार्क, ऑकलंड ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून
ए. दि. २९७५ १३ मार्च २०१० डॅनिएल व्हेट्टोरी रिकी पॉंटिंग टीम साऊथी वेस्टपॅक मैदान, वेलिंग्टन न्यू झीलंड ५१ धावांनी

२०१०-११ मालिका, भारत (विश्वचषक २०११)[संपादन]

२०१०-११ च्या मोसमात ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड संघ फक्त एका एकदिवसीय सामन्यासाठी आमने-सामने आले ते १२ फेब्रुवारी २०११ रोजी नागपूर, भारत येथे खेळवल्या गेलेल्या क्रिकेट विश्वचषक, २०११च्या गट फेरी दरम्यान झालेल्या सामन्यात. त्यामुळे दोन्ही देशांनी सदर सामन्यात चॅपेल-हॅडली चषकासाठी लढत देण्याचे ठरवले. ऑस्ट्रेलियाने सामना ७ गडी राखून जिंकला.[१४]

चॅपेल-हॅडली चषक, २०१०-११. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी १–०.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक न्यू झीलंड कर्णधार ऑस्ट्रेलिया कर्णधार सामनावीर स्थळ निकाल
ए. दि. ३१०७ २५ फेब्रुवारी २०११ डॅनिएल व्हेट्टोरी रिकी पॉंटिंग मिचेल जॉन्सन विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून

२०१४-१५ मालिका, न्यू झीलंड (विश्वचषक २०१५)[संपादन]

२०१४-१५ च्या मोसमात सुद्धा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड संघ फक्त एका एकदिवसीय सामन्यासाठी २८ फेब्रुवारी २०१५ रोजी ऑकलंड, न्यू झीलंड येथे खेळवल्या गेलेल्या क्रिकेट विश्वचषक, २०१५च्या गट फेरी दरम्यान झालेल्या सामन्यात आमने-सामने आले. त्यामुळे दोन्ही देशांनी सदर सामन्यात चॅपेल-हॅडली चषकासाठी लढत देण्याचे ठरवले. न्यू झीलंडने सामना १ गडी राखून जिंकला.

चॅपेल-हॅडली चषक २०१४-१५. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका निकाल: न्यू झीलंड विजयी १-०.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक न्यू झीलंड कर्णधार ऑस्ट्रेलिया कर्णधार सामनावीर स्थळ निकाल
ए. दि. ३६१७ २८ फेब्रुवारी २०१५ ब्रॅंडन मॅककुलम मायकेल क्लार्क ट्रेंट बोल्ट इडन पार्क, ऑकलंड न्यू झीलंड १ गडी राखून

२०१५-१६ मालिका, न्यू झीलंड[संपादन]

चॅपेल-हॅडली चषक, २०१५-१६. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका निकाल: न्यू झीलंड विजयी २–१.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक न्यू झीलंड कर्णधार ऑस्ट्रेलिया कर्णधार सामनावीर स्थळ निकाल
ए. दि. ३७३१ ३ फेब्रुवारी २०१६ ब्रॅंडन मॅककुलम स्टीव्ह स्मिथ मार्टीन गुप्टिल इडन पार्क, ऑकलंड न्यू झीलंड १५९ धावांनी
ए. दि. ३७३३ ६ फेब्रुवारी २०१६ ब्रॅंडन मॅककुलम स्टीव्ह स्मिथ मिचेल मार्श वेस्टपॅक मैदान, वेलिंग्टन ऑस्ट्रेलिया ४ गडी राखून
ए. दि. ३७३५ ८ फेब्रुवारी २०१६ ब्रॅंडन मॅककुलम स्टीव्ह स्मिथ इश सोढी सेडन पार्क, हॅमिल्टन न्यू झीलंड ५५ धावांनी

२०१६-१७ मालिका, ऑस्ट्रेलिया[संपादन]

चॅपेल-हॅडली चषक, २०१६-१७. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका निकाल: ऑस्ट्रेलिया विजयी ३–०.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक न्यू झीलंड कर्णधार ऑस्ट्रेलिया कर्णधार सामनावीर स्थळ निकाल
ए.दि. ३८११ ४ डिसेंबर स्टीव्ह स्मिथ केन विल्यमसन स्टीव्ह स्मिथ सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६८ धावांनी
ए.दि. ३८१२ ६ डिसेंबर स्टीव्ह स्मिथ केन विल्यमसन डेव्हिड वॉर्नर मानुका ओव्हल, कॅनबेरा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ११६ धावांनी
ए.दि. ३८१३ ९ डिसेंबर स्टीव्ह स्मिथ केन विल्यमसन डेव्हिड वॉर्नर मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ११७ धावांनी

२०१६-१७ मालिका, न्यू झीलंड[संपादन]

चॅपेल-हॅडली चषक, २०१६-१७. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका निकाल: न्यू झीलंड विजयी २–०.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक न्यू झीलंड कर्णधार ऑस्ट्रेलिया कर्णधार सामनावीर स्थळ निकाल
ए.दि. ३८२९ ३० जानेवारी केन विल्यमसन ॲरन फिंच मार्कस स्टोइनिस (ऑ) इडन पार्क, ऑकलंड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ६ धावांनी
ए.दि. ३८३०अ २ फेब्रुवारी केन विल्यमसन ॲरन फिंच मॅकलीन पार्क, नेपियर सामना रद्द
ए.दि. ३८३२ ५ फेब्रुवारी केन विल्यमसन ॲरन फिंच ट्रेंट बोल्ट (न्यू) सेडन पार्क, हॅमिल्टन न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २४ धावांनी

२०१९-२० मालिका, ऑस्ट्रेलिया[संपादन]

चॅपेल-हॅडली चषक - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १३ मार्च सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
२रा ए.दि. १५ मार्च सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
३रा ए.दि. २० मार्च बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ न्यू झीलंडच्या एकदिवसीय संघात हॉज क्रिकइन्फो
 2. ^ फ्लेमिंगच्या शस्त्रक्रियेमुळे व्हेट्टरी न्यू झीलंडचा कर्णधार क्रिकइन्फो
 1. ^ "आकडेवारी / स्टॅट्सगुरु / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / फलंदाजीतील नोंदी – चॅपेल-हॅडली चषक" (इंग्रजी भाषेत). २१ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
 2. ^ "आकडेवारी / स्टॅट्सगुरु / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / गोलंदाजीतील नोंदी – चॅपेल-हॅडली चषक" (इंग्रजी भाषेत). २१ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
 3. ^ "न्यूझीलंड वि ऑस्ट्रेलिया" (इंग्रजी भाषेत). २२ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
 4. ^ "चॅपेल-हॅडली चषक नोंदी". इएसपीएन क्रिकइन्फो.
 5. ^ "सांख्यिकी / स्टॅट्सगुरु / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / एकूण/सर्व नोंदी – चॅपेल-हॅडली चषक, २००७/०८" (इंग्रजी भाषेत). २२ नोव्हेंबर २०१० रोजी पाहिले.
 6. ^ "सांख्यिकी / स्टॅट्सगुरु / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / एकूण/सर्व नोंदी – चॅपेल-हॅडली चषक" (इंग्रजी भाषेत). २२ नोव्हेंबर २०१० रोजी पाहिले.
 7. ^ "चॅपेल-हॅडली चषक नोंदी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
 8. ^ "ट्वेंटी२० मालिका जाहीर, अंतिम सामन्याचे यजमानपद न्यूझीलंडकडे". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). ६ फेब्रुवारी २०१७ रोजी पाहिले.
 9. ^ न्यूझीलंडचा विक्रमधी पाठलाग, बीबीसी स्पोर्ट, ८ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
 10. ^ "आकडेवारी/ स्टॅट्सगुरु / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने / संघ नोंदी". क्रिकइन्फो. ८ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
 11. ^ ऑस्ट्रेलिया स्लम टू १० विकेट डीफीट इएसपीएन क्रिकसन्फो, ८ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
 12. ^ दक्षिण आफ्रिकेला पहिले स्थान इएसपीएन क्रिकसन्फो, ८ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
 13. ^ a b स्टनिंग मॅकमिलन सील्स व्हाईटवॉश इएसपीएन क्रिकसन्फो, ८ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.
 14. ^ a b http://www.espncricinfo.com/icc_cricket_worldcup2011/content/story/502553.html

बाह्यदुवे[संपादन]