बोधिवृक्ष (नाशिक)
महाराष्ट्रातील नाशिक शहरातील त्रिरश्मी बुद्ध लेणीच्या पायथ्याशी बांधलेल्या बौद्ध स्मारक स्तूपाभोवती बोधिवृक्ष लावण्यात आला आहे. हा बोधिवृक्ष श्रीलंकेतील अनुराधापुर येथून आणला होता. हा बोधिवृक्ष महाबोधी वृक्षाची एक शाखा आहे ज्याच्या खाली भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले होते.[१][२][३]
बोधगयेच्या महाबोधी विहारात असलेले पिंपळ हे महाबोधी वृक्ष या नावाने प्रसिद्ध आहे. इ.स.पू. ५२८ मध्ये या पिंपळाच्या झाडाखाली सिद्धार्थाला ज्ञान प्राप्त झाले आणि ते बुद्ध झाले. सम्राट अशोकाची कन्या संघमित्रा हिने या महा बोधिवृक्षाची एक शाखा श्रीलंकेत नेली आणि अनुराधापुर येथे लावली. अनुराधापुरातील या बोधिवृक्षाची एक शाखा ऑक्टोबर २०२३ मध्ये नाशिकच्या त्रिरश्मी बुद्ध लेणीच्या पायथ्याशी असलेल्या बौद्ध स्तूपाच्या परिसरात लावण्यात आली आहे.[४][५]
जून २०२३ मध्ये भारतीय भिक्खू सुगत आणि भिक्खू संघरत्न यांनी अनुराधापुराच्या मुख्य भिक्खूंना त्रिरश्मी लेणीच्या परिसरात बोधिवृक्ष लावण्यासाठी एका शाखा देण्याची विनंती केली. त्यानंतर अनुराधापुर येथील बोधिवृक्षाची एक शाखा श्रीलंकेतून भारतात आणण्यात आली. २४ ऑक्टोबर २०२३ रोजी विजयादशमीच्या निमित्ताने त्रिरश्मी बुद्ध लेणीच्या पायथ्याशी असलेल्या बुद्ध स्मारक स्तूपाच्या परिसरात हा बोधिवृक्ष लावण्यात आला. या बोधिवृक्ष रोपण नियोजन कार्यक्रमाला "ऐतिहासिक महाबोधी वृक्ष महामहोत्सव २०२३" असे नाव देण्यात आले. शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्ट, नाशिक आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.[६][७]
भारत आणि श्रीलंका तसेच थायलंड, कंबोडिया, नेपाळ आणि मलेशिया येथील अनेक भिक्खू आणि इतर उपासक या कार्यक्रमाला उपस्थित होते. हा कार्यक्रम भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील राजकीय नेते, नाशिक शहरातील सरकारी अधिकारी आणि लाखो बौद्ध अनुयायी यांच्या उपस्थितीत पार पडला. भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली याचा आता अस्तित्वात असलेला एक साक्षीदार म्हणजे हा बोधिवृक्ष होय. हा बोधिवृक्ष पाहून, त्याला वंदन करून बौद्ध उपासकाला बुद्धांचे स्मरण होईल, या उद्देशाने भारतीय भिक्खूंनी नाशिकमध्ये हा बोधिवृक्ष लावण्याचा होता.[८][९]
संदर्भ
[संपादन]- ^ maharashtralokmanch (2023-10-24). "त्रिरश्मी बुद्धलेणी नाशिक येथे ऐतिहासिक महाबोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण". Maharashtra Lokmanch (इंग्रजी भाषेत). 2024-09-07 रोजी पाहिले.
- ^ सोनवणे, गणेश (2023-10-25). "Nashik News : ऐतिहासिक महाबोधिवृक्षाच्या फांदीचे रोपण". Pudhari News. 2024-09-07 रोजी पाहिले.
- ^ टीम, एबीपी माझा वेब (2023-10-24). "नाशिक बुद्ध स्मारकात बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण; देश-विदेशांतील भिक्खू, अनुयायांची उपस्थिती". marathi.abplive.com. 2024-09-07 रोजी पाहिले.
- ^ दिव्य मराठी. "बोधगयानंतर बोधिवृक्ष असलेले नाशिक आता देशातील दुसरे शहर:मूळ वृक्षाची फांदी श्रीलंकेतील अनुराधापुरा येथून नाशिकमध्ये".
- ^ टीम, एबीपी माझा वेब. "विजयादशमीला नाशिकच्या त्रिरश्मी लेणीवर श्रीलंकेतील बोधिवृक्षाचे रोपण, असा असेल कार्यक्रम!". ABP Marathi. 2024-09-07 रोजी पाहिले.
- ^ वृत्तसेवा, सकाळ (2023-10-25). "Nashik News : ऐतिहासिक महाबोधी वृक्षाचे रोपण; जागतिक पर्यटनात नाशिकचे महत्त्व वाढणार". Marathi News Esakal. 2024-09-07 रोजी पाहिले.
- ^ वृत्तसेवा, सकाळ. "Nashik News : 24 ऑक्टोबरला फांदीचे रोपण; बोधीवृक्ष महोत्सवाच्या काटेकोर नियोजनाच्या सूचना". Marathi News Esakal. 2024-09-07 रोजी पाहिले.
- ^ टीम, एबीपी माझा वेब (2023-10-24). "नाशिक बुद्ध स्मारकात बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण; देश-विदेशांतील भिक्खू, अनुयायांची उपस्थिती". marathi.abplive.com. 2024-09-07 रोजी पाहिले.
- ^ वृत्तसेवा, सकाळ (2023-10-25). "Nashik News : ऐतिहासिक महाबोधी वृक्षाचे रोपण; जागतिक पर्यटनात नाशिकचे महत्त्व वाढणार". Marathi News Esakal. 2024-09-07 रोजी पाहिले.