नाशिक रोड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नाशिकरोड या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

नाशिक रोड हे नाशिक शहराचे एक उपनगर आहे. येथे भारतीय रेल्वे चे स्थानक आहे.

नाशिक रोड येथे नोटांचा छापखाना आहे. तसेच नाशिक शहराचे रेल्वे स्थानकही आहे. नाशिकरोड येथे पूर्वी मद्यार्काचा सरकारी कारखाना होता. तो कारखाना आता बंद केला आहे. नाशिकरोडचा जेलरोड हा भाग वेगाने विकसित झाला आहे. जेलरोडवर सरकारी तुरुंग आहे.

पंचवटी, सीबीएस(सेन्ट्रल बस स्टेशन) तसेच नाशिकरोड येथून पांडवलेणीकरिता बसेस सुटतात.