मणिपूर विधानसभा
Appearance
Unicameral state legislature of Manipur in India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | विधानसभा | ||
---|---|---|---|
ह्याचा भाग | Government of Manipur | ||
स्थान | भारत | ||
कार्यक्षेत्र भाग | मणिपूर | ||
भाग |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
मणिपूर विधानसभा हे भारताच्या मणिपूर राज्याच्या विधिमंडळाचे एकमेव सभागृह एक आहे. ६० आमदारसंख्या असलेल्या मणिपूर विधानसभेचे कामकाज इम्फाल शहरामधून चालते. भारतीय जनता पार्टीचे युम्नान खेमचिंद सिंह हे विधानसभेचे सभापती असून मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह विधानसभेचे नेते आहेत. भारताच्या इतर विधिमंडळांप्रमाणे मणिपूर विधानसभेचा कालावधी ५ वर्षांचा असतो व आमदारांची निवड निवडणुकीद्वारे होते. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे ३१ जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. विद्यमान १०वी विधानसभा २०२२ सालच्या निवडणुकीनंतर अस्तित्वात आली. ह्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा सदस्य असलेल्या भारतीय जनता पार्टीने ३२ जागांवर विजय मिळवून राज्यातील सत्ता राखली.
सद्य विधानसभेची रचना
[संपादन]सरकार
राष्ट्रीय लोकशाही आघाडी (47)
- भारतीय जनता पार्टी (32)
- जनता दल (संयुक्त) (6)[१]
- नागा पीपल्स फ्रंट (5)[२]
- कुकी पीपल्स अलायन्स (2)[३]
- अपक्ष (2)
इतर (13)
- नॅशनल पीपल्स पार्टी (7)
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (5)
- अपक्ष (1)
बाह्य दुवे
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Janata Dal (United) to support BJP in Manipur". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2022-03-13. 2022-03-19 रोजी पाहिले.
- ^ "NPF extends support to BJP in Manipur | Nagaland Post" (इंग्रजी भाषेत). 2022-03-12 रोजी पाहिले.
- ^ Jimmy Leivon (18 March 2022). "Newly formed Kuki People's Alliance pledges support to BJP in Manipur". The Indian Express. 19 March 2022 रोजी पाहिले.