झी मराठी सर्वोत्कृष्ट नायक पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झी मराठी सर्वोत्कृष्ट नायक पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
प्रथम पुरस्कार २००४
शेवटचा पुरस्कार २०२३
Highlights
एकूण पुरस्कार २०
पहिला विजेता नायक दिलीप प्रभावळकरश्रीयुत गंगाधर टिपरे – गंगाधर (आबा) टिपरे (२००४)
शेवटचा विजेता नायक ऋषिकेश शेलार — तुला शिकवीन चांगलाच धडा – अधिपती सूर्यवंशी (२०२३)

झी मराठी सर्वोत्कृष्ट नायक पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम नायकाला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर प्रसाद ओक (अवघाचि संसार) आणि सुबोध भावे यांनी हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (२) जिंकला आहे.

विजेते[संपादन]

वर्ष नायक मालिका भूमिका
२००४ दिलीप प्रभावळकर श्रीयुत गंगाधर टिपरे गंगाधर (आबा) टिपरे
२००५ अरुण नलावडे वादळवाट श्रीकृष्ण (आबा) चौधरी
२००६ अनिकेत विश्वासराव ऊन पाऊस सागर सरदेसाई
२००७ प्रसाद ओक अवघाचि संसार हर्षवर्धन भोसले
२००८
२००९ सुबोध भावे कुलवधू विक्रमादित्य राजेशिर्के
२०१० अभिजीत खांडकेकर माझिया प्रियाला प्रीत कळेना अभिजीत पेंडसे
२०११[१] भूषण प्रधान पिंजरा विरेंद्र (वीर) देशमुख
२०१२ चिन्मय मांडलेकर तू तिथे मी सत्यजित मुधोळकर
२०१३ शशांक केतकर होणार सून मी ह्या घरची श्रीरंग गोखले
२०१४[२] ललित प्रभाकर जुळून येती रेशीमगाठी आदित्य देसाई
२०१५ देवदत्त नागे जय मल्हार खंडोबा
२०१६[३] ऋषी सक्सेना काहे दिया परदेस शिवकुमार शुक्ल
२०१७[४] हार्दिक जोशी तुझ्यात जीव रंगला रणविजय (राणा) गायकवाड
२०१८[५] सुबोध भावे तुला पाहते रे विक्रांत सरंजामे
२०१९[६] अतुल परचुरे भागो मोहन प्यारे मोहन अष्टपुत्रे
२०२०-२१[७] शाल्व किंजवडेकर येऊ कशी तशी मी नांदायला ओंकार (ओम) खानविलकर
२०२१[८] श्रेयस तळपदे माझी तुझी रेशीमगाठ यशवर्धन चौधरी
२०२२[९] स्वप्नील जोशी तू तेव्हा तशी सौरभ पटवर्धन
२०२३[१०] ऋषिकेश शेलार तुला शिकवीन चांगलाच धडा अधिपती सूर्यवंशी

हे सुद्धा पाहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "'झी मराठी पुरस्कार सोहळा': 'पिंजरा' मालिकेस सर्वाधिक पुरस्कार". दिव्य मराठी. 2011-10-09. 2022-11-24 रोजी पाहिले.
  2. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१४'चे मानकरी". लोकसत्ता. 2014-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  3. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१६' विजेत्यांची संपूर्ण यादी". लोकसत्ता. 2016-10-17. 2021-04-06 रोजी पाहिले.
  4. ^ "राणा-शीतली ठरले सर्वोत्कृष्ट ॲक्टर-ॲक्ट्रेस, जाणून घ्या कुणीकुणी पटकावला झी मराठी अवॉर्ड". दिव्य मराठी. 2017-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  5. ^ "झी मराठी अवॉर्ड्स २०१८च्या पुरस्कारांची यादी". झी २४ तास. 2018-10-29. 2021-04-06 रोजी पाहिले.
  6. ^ "या मालिकेने मारली झी मराठी अवॉर्ड्समध्ये बाजी, नुकतीच सुरू झालीय ही मालिका". लोकमत. 2019-10-12. 2021-04-06 रोजी पाहिले.
  7. ^ "'माझा होशील ना' अव्वल, सईचा डबल धमाका, ओम-देवमाणूसचाही सन्मान". टीव्ही९ मराठी. 2021-04-05. 2021-04-06 रोजी पाहिले.
  8. ^ "'येऊ कशी तशी मी नांदायला' आणि 'माझी तुझी रेशीमगाठ'ची धूम, अनेक पुरस्कारांवर कोरले नाव!". टीव्ही९ मराठी. 2021-11-02. 2022-11-02 रोजी पाहिले.
  9. ^ "'माझी तुझी रेशीमगाठ' ने पुन्हा गाजवले झी मराठी अवॉर्ड; वाचा विजेत्यांची यादी". महाराष्ट्र टाइम्स. 2022-10-15.
  10. ^ "सर्वोत्कृष्ट नायक, नायिका ते बेस्ट सीरियल... झी मराठी अवॉर्ड सोहळ्यात या मालिकेचीच हवा". महाराष्ट्र टाइम्स. 2023-11-04 रोजी पाहिले.