देवदत्त नागे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

देवदत्त नागे (जन्म : ०६ फेब्रुवारी १९८१, अलिबाग, महाराष्ट्र) एक भारतीय मराठी अभिनेता आहे[१]. जय मल्हार या मालिकेत भगवान खंडोबाच्या भूमिकेतून त्यांना प्रसिद्धी मिळाली.[२]

वैयक्तिक जीवन आणि शिक्षण[संपादन]

देवदत्त नागे यांनी कांचन नागे यांच्याशी लग्न केले आहे. त्यांनी बी.एससी. केमिस्ट्रीमध्ये पदवी पूर्ण केली आणि 10 वर्षे पॅरामेडिकलमध्ये काम केले आहे.[३]

कारकीर्द[संपादन]

२०११ मध्ये देवदत्त नागे यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. २०११ मध्ये कलर्स टीव्हीची मालिका 'वीर शिवाजी' यात त्यांनी तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारली. तो कलर्स टीव्हीच्या 'लागी तुझसे लगान' या मालिकेतही दिसला होता. झी मराठीची लोकप्रिय मालिका जय मल्हार मध्ये त्यांनी श्री खंडेरायांची भूमिका केली होती.[४] देवदत्त नागे आयएमडीबीवर

मालिका[संपादन]

 • डॉक्टर डॉन
 • लागी तुझसे लगान
 • देवयानी
 • जय मल्हार
 • वीर शिवाजी
 • मृत्युंजय : कर्णाची अमरगाथा
 • कालाय तस्मै नमः
 • बाजीराव मस्तानी

चित्रपट[संपादन]

 • संघर्ष
 • वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा
 • सत्यमेव जयते
 • तान्हाजी

संदर्भ[संपादन]

 1. ^ World, Republic. "'Jai Malhar' fame Devdatta Nage's transformation picture will give you major fitness goals". Republic World. 2020-09-16 रोजी पाहिले.
 2. ^ "Doctor Don: Did You Know Valentines' Day Has Been Moved To September? Watch This Video!". ZEE5 News (इंग्रजी भाषेत). 2020-09-15. 2020-09-16 रोजी पाहिले.
 3. ^ "बाईकच्या क्रेझने देवदत्त नागेला मिळाला अनोखा टॅटू". Loksatta. 2020-09-09. 2020-09-16 रोजी पाहिले.
 4. ^ "Devdatta Nage makes a comeback on TV after two years - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-09-16 रोजी पाहिले.