हार्दिक जोशी
हार्दिक जोशी | |
---|---|
जन्म |
६ ऑक्टोबर, १९८८ मुंबई, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
कारकीर्दीचा काळ | २००८ - चालू |
भाषा | मराठी |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | तुझ्यात जीव रंगला, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं! |
पुरस्कार | झी मराठी सर्वोत्कृष्ट नायक पुरस्कार २०१७ |
पत्नी |
अक्षया देवधर (ल. २०२२) |
हार्दिक जोशी (जन्म: ६ ऑक्टोबर १९८८) हा मुंबईतील एक मराठी दूरचित्रवाणी आणि चित्रपट अभिनेता आहे. झी मराठी च्या तुझ्यात जीव रंगला या मालिकेत राणा या भूमिकेसाठी तो ओळखला जातो. सध्या तो तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं! या मालिकेत सिद्धार्थची भूमिका करत आहे.[१]
कारकीर्द
[संपादन]हार्दिक २०१६ मकरंद अनासपुरे यांच्या चित्रपट रंगा पतंगा मध्ये दिसला. २०१६ पर्यंत, त्याने झी मराठी च्या तुझ्यात जीव रंगला या कार्यक्रमात राणादा ही मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. त्याचे पात्र अक्षया देवधरने साकारलेल्या अंजलीच्या प्रेमात पडते. २०१७ मध्ये, तो जर्नी प्रेमाची या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसला.
तो श्री स्वामी समर्थ महाराजांचा निस्सीम भक्त आहे, हार्दिक झी मराठी च्या अस्मिता आणि राधा ही बावरी सारख्या शोमध्ये दिसला आहे. स्टार प्रवाह च्या दुर्वा या शोमध्ये त्याने पुरुषोत्तम गोखलेची भूमिका केली होती आणि स्वप्नांच्या पलिकडले आणि क्राइम पेट्रोल मध्ये ही तो दिसला आहे.
मालिका
[संपादन]वर्ष | मालिका | भूमिका | टिपा | संदर्भ |
---|---|---|---|---|
२००८ | राजा शिवछत्रपती | कर्तलब खान | ||
२०११ | राधा ही बावरी | सहाय्यक व्यक्तिरेखा | ||
२०१३ | दुर्वा | पुरुषोत्तम गोखले | ||
२०१४ | अस्मिता | एपिसोड भूमिका | ||
२०१६ - २०२० | तुझ्यात जीव रंगला | रणविजय गायकवाड (राणा) | मुख्य भूमिका | [२][३] |
२०१९ | अघोरी | विपरांजली | सहाय्यक व्यक्तिरेखा | |
२०२१ - चालू | तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं! | सिद्धार्थ देशमुख (सिद्)धू | मुख्य भूमिका | [४] |
संदर्भ
[संपादन]- ^ "Hardeek Joshi crosses 250K followers on Instagram; shows gratitude to his fans". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 25 June 2019. 2 April 2020 रोजी पाहिले.
- ^ "Tujhyat Jeev Rangala to take a leap; Ranada will make a re-entry soon". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 19 June 2019. 27 April 2020 रोजी पाहिले.
- ^ "'रांगड्या जीवाला प्रेमाचा तू आसरा' म्हणत राणा देतोय त्याच्या प्रेमाची कबुली". लोकसत्ता. 2017-06-26. 2017-07-11 रोजी पाहिले.
- ^ "Exclusive - Hardeek Joshi to make his TV comeback with Tuzhya Mazhya Sansarala Aani Kay Hava - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2022-04-19 रोजी पाहिले.