Jump to content

बजरंग पुनिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बजरंग पुनिया
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव बजरंग पुनिया
राष्ट्रीयत्व भारतीय
निवासस्थान हरयाणा, भारत
जन्मदिनांक २६ फेब्रुवारी, १९९४ (1994-02-26) (वय: ३०)
खेळ
देश भारत
खेळ कुस्ती
खेळांतर्गत प्रकार फ्रीस्टाईल कुस्ती
प्रशिक्षक योगेश्वर दत्त


बजरंग पुनिया (२६ फेब्रुवारी १९९४) हा भारतीय कुस्तीगीर आहे. २०२० च्या तोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने ६५ किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकले.[]

सुरुवातीचे आयुष्य

[संपादन]

भारतातील हरियाणा राज्यामधील झज्जर जिल्ह्यात असलेल्या खुदान गावी बजरंग पुनियाचा जन्म झाला. वयाच्या सातव्या वर्षापासून त्याने कुस्ती खेळायला सुरुवात केली आणि हा खेळ खेळण्याकरता त्याचे वडील बलवान सिंग यांनी त्याला प्रोत्साहन दिले.हरिंदर सिंह पुनिया हा एक भाऊ आहे. भारतीय खेळ प्राधिकरणाच्या सोनीपत येथील प्रादेशिक केंद्रात त्याला कुस्ती शिकता यावी म्हणून २०१५ मध्ये त्याच्या परिवाराने सोनीपत येथे स्थलांतर केले. सुरुवातीला त्याने सोनीपत येथे आणि नंतर दिल्ली येथील छत्रसाल स्टेडियममध्ये त्याने प्रशिक्षण घेतले. पुढे कर्नालमधील हरियाणा पोलीस अकादमीत तो सराव करत होता. सध्या तो कुस्तीगीर योगेश्वर दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली गोहना येथे सराव करत आहे.[] तो भारतीय रेल्वेमध्ये तिकीट परीक्षक म्हणून कार्यरत आहे.

कारकीर्द

[संपादन]
  • २०१३ आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा : नवी दिल्ली येथे झालेल्या या स्पर्धेत बजरंगने ६० किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवले.
  • २०१३ जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा : बुडापेस्ट, हंगेरी येथे झालेल्या या स्पर्धेत बजरंगने ६० किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवले.
  • २०१४ राष्ट्रकुल स्पर्धा: ग्लासगो, स्कॉटलंड येथे झालेल्या या स्पर्धेत बजरंगने ६१ किलो वजनी गटात रजत पदक मिळवले.[]
  • २०१४ आशियाई खेळ: दक्षिण कोरियातील इंचीऑन येथे झालेल्या या स्पर्धेत बजरंगने ६१ किलो वजनी गटात रजत पदक मिळवले.
  • २०१४ आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा : अस्ताना, कझाकिस्तान येथे झालेल्या या स्पर्धेत बजरंगने ६१ किलो वजनी गटात रजत पदक मिळवले.
  • २०१७ आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा : नवी दिल्ली येथे झालेल्या या स्पर्धेत बजरंगने ६० किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवले.
  • २०१८ राष्ट्रकुल स्पर्धा: गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या या स्पर्धेत बजरंगने ६५ किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवले.[]
  • २०१८ आशियाई खेळ : बजरंगने इंडोनेशिया येथील जकार्ता येथे झालेल्या २०१८ सालच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बजरंगने ६५ किलो वजनी गटात अंतिम फेरीत जपानच्या ताकातानी दाईईची या मल्लास हरवून सुवर्ण पदक मिळवले.[]
  • २०१८ जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा: बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ६५ किलो वजनी गटात अंतिम सामन्यात जपानी मल्ल ताकुतो ओतुगारो याच्याकडून १६-९ असा पराभव पत्करावा लागल्यामुळे बजरंगला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.या पदामुळे जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत दोन वेळा पदके मिळवणारा तो पहिलाच भारतीय ठरला.[]
  • २०२२ राष्ट्रकुल स्पर्धा: बर्मिंगहॅम, इंग्लंड येथे झालेल्या या स्पर्धेत बजरंगने ६५ किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवले.[]

पुरस्कार

[संपादन]
  • पद्मश्री पुरस्कार(२०१९)[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Bajrang Punia Win Bronze Medal: बजरंग बली की जय; पुनियाने जिंकले कांस्यपदक, देशाला मिळाले सहावे पदक". Maharashtra Times. 2021-08-08 रोजी पाहिले.
  2. ^ "जकार्ता में बली बने बजरंग, गुरु योगेश्वर दत्त से किया वादा निभाया- Amarujala". Amar Ujala. 2018-08-21 रोजी पाहिले.
  3. ^ "मां को मिलेगी चूल्हे से निजात, पिता को कोठी देगा CWG पदक विजेता बजरंग". Dainik Bhaskar (हिंदी भाषेत). 2018-08-21 रोजी पाहिले.
  4. ^ "CWG 2018 : बजरंग ने रजत को स्वर्ण में किया तब्दील, भारत के लिए जीता 17वां गोल्ड मैडल". www.patrika.com (हिंदी भाषेत). 2018-08-21 रोजी पाहिले.
  5. ^ "कुस्तीगीर बजरंग पुनियाने हिंदुस्थानला मिळवून दिले पहिले सुवर्णपदक - Saamana | DailyHunt". DailyHunt (इंग्रजी भाषेत). 2018-08-20 रोजी पाहिले.
  6. ^ "World Wrestling Championship 2018: बजरंग पुनियाला रौप्यपदक". Loksatta. 2018-10-22. 2018-10-23 रोजी पाहिले.
  7. ^ "बजरंग पुनियला लागोपाठ दुसऱ्या कॉमनवेल्थमध्ये सुवर्ण पदक, भारताला 7वे गोल्ड!". News18 Lokmat. 2022-08-05. 2022-08-07 रोजी पाहिले.
  8. ^ "पद्म पुरस्कार यादी". २८ जानेवारी २०१९ रोजी पाहिले.