हिवरा धरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हिवरा मध्यम प्रकल्प
अधिकृत नाव हिवरा धरण
धरणाचा उद्देश सिंचन, पाणीपुरवठा
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
हिवरा
स्थान गाव: खडकदेवळा, तालुका: पाचोरा, जिल्हा: जळगाव
लांबी ३,८६० मी (१२,६६० फूट)
उंची १५.२१ मी (४९.९ फूट)
बांधकाम सुरू १९७७
बांधकाम खर्च १६.९८ करोड
जलाशयाची माहिती
क्षमता १२.७७ मिलियन क्यूब मीटर
जलसंधारण क्षेत्र ४२०४ हेक्टर
भौगोलिक माहिती
निर्देशांक 20°35′N 75°21′E / 20.59°N 75.35°E / 20.59; 75.35
व्यवस्थापन महाराष्ट्र शासन

हिवरा मध्यम प्रकल्प हे जळगाव जिल्ह्यातील हिवरा नदीवरील खडकदेवळा या गावाजवळ बांधण्यात आलेले आहे. पाचोरा तालुक्यातील जवळजवळ ४२०४ हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली आलेले आहे.

सिंचन[संपादन]

हिवरा धरणाला डावा आणि उजवा असे दोन कॅनॉल आहेत. दोघं कॅनॉल मधून रब्बी हंगामासाठी पाण्याची आवर्तने सोडून ४२०४ हेक्टर जमीन ओलिताखाली आलेली आहे. हिवरा धरणातून रब्बी व उन्हाळी पिकांच्या सिंचनासाठी कॅनॉलद्वारे दरवर्षी पाण्याचा मोठा विसर्ग पाचोरा तालुक्यात होत असतो.

पाणी पुरवठा[संपादन]

तारखेडा, जारगाव या शेजारील गावांना हिवरा धरणातून पिण्यासाठी पाणी पुरवठा होतो. संबंधित गावांनी हिवरा धरणामागे सरकारच्या परवानगीने विहीर खोदून पाणी गावांपर्यंत नेले आहे.


पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या

पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे