प्रहार (वृत्तपत्र)
प्रहार (वृत्तपत्र) | |
---|---|
![]() | |
प्रकार | दैनिक |
आकारमान | ७४९ बाय ५९७ |
मालक | नारायण राणे |
प्रकाशक | राणे प्रकाशन प्रा.लि |
संपादक | बाबर विजय |
मुख्य संपादक | नारायण राणे |
स्थापना | ऑक्टोबर ९, इ.स. २००८ |
भाषा | मराठी |
किंमत | चार रुपये |
मुख्यालय | ![]() |
| |
संकेतस्थळ: प्रहार.इन |
प्रहार हे महाराष्ट्रातील मुंबई शहरातून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र आहे. हे वृत्तपत्र ऑक्टोबर ९, इ.स. २००८ रोजी सुरू झाले. महाराष्ट्रातील राजकीय नेते नारायण राणे हे याचे सल्लागार संपादक आहेत. तर २०१५ पर्यंत महेश बळीराम म्हात्रे हे त्याचे संपादक होते. त्यानंतर मधुकर भावे यांच्याकडे संपादक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मुंबईसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथून प्रहारच्या आवृत्या प्रसिद्ध होतात.
अमेरिकेतील ऑग्टन येथील वृत्तपत्राचे संग्रहालय असून त्याला न्यूझियम असे म्हणतात. या न्यूझियम मध्ये जगभरातील ८००हून अधिक वृत्तपत्रांचा समावेश करण्यात आला आहे. या न्यूझियममध्ये भारतातील १४ वृत्तपत्रांचा समावेश असून मराठीतील केवळ प्रहार हे एकमेव दैनिकाचा न्यूझियममध्ये सामावेश आहे.[१]