Jump to content

बहुमाध्यम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माध्यम हे मूलतः संदेश देवाण-घेवाणीचे कार्य करते. मुद्रित माध्यमातून लिखित स्वरूपातील संदेश दिला जातो. त्याचप्रमाणे, दूरचित्रवाणी वाहिनीतून चलत्-चित्रांद्वारे संदेश दिला जातो. रेडिओ अथवा आकाशवाणीतून ग्रहण करता येईल असा संदेश आवाजाद्वारे दिला जातो. गेल्या दशकभरात इंटरनेट किंवा माहितीजाल माध्यम म्हणून पुढे आले आहे. या सर्व माध्यमांचे त्यांच्या त्यांच्या उपयुक्ततेनुसार संदेशासाठी वापर करणे म्हणजे बहुमाध्यम, असे ढोबळमानाने म्हणता येईल.

प्रत्येक संदेशाची स्वतःची अशी एक क्षमता असते. ही क्षमता प्रभावीपणे व्यक्त करणारे माध्यम निवडणे आणि त्याद्वारे संदेश पाठविणे, म्हणजे बहुमाध्यम होय.

ज्यावेळी एकाच व्यक्ती अथवा संस्थेकडे नभोवाणी , चित्रवाणी ,वृत्तपत्रे यासह विविध माध्यमांची मालकी अस्क़ि त्यास बहुमाध्यम मालकी म्हणतात.

माध्यम स्पर्धा

माध्यमांची संख्या वाढत असल्याने माध्यमातील स्पर्धाही वाढत आहे.