भारंगी
(भारंगी नदी या पानावरून पुनर्निर्देशित)
भारंगी | |
---|---|
पाणलोट क्षेत्रामधील देश | ठाणे जिल्हा, महाराष्ट्र |
भारंगी ही महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एक नदी आहे. महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर तालुक्यात ही भारंगी नदी आहे. ही नदी भातसई नदीची उपनदी आहे. भारंगी नदी माहुलीगड नावाच्या किल्ल्याच्या जवळून वाहते.
- भारंगी (Clerodendrum serratum; Clerodendrum indicum) या नावाची एक औषधी वनस्पती आहे. हिला संस्कृतमध्ये भारंगी, भार्गी, ब्राह्मणयष्टिका, अंधिकी किंवा फञ्जी म्हणतात. हीच कोकणात उगवणारी भारंगी नावाची पावसाळी पालेभाजी असावी. ठाणे-मुंबईत अनेक ठिकाणी ती फक्त पावसाळ्यात मिळते.
- भारंगी (Rotheca serrata) नावाचे एक फूलझाड आहे.
- भारतातल्या कर्नाटक राज्यात भारंगी होबळी नावाचा एक ग्रामसमूह (होबळी) आहे. त्या होबळीमध्ये असलेल्या कारगल गावाजवळचे लिंगणमक्की धरण प्रसिद्ध आहे.
पहा : जिल्हावार नद्या