अढुळा नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अडुळा नदी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
अढुळा नदी
इतर नावे अडुळा नदी
उगम अकोले, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र राज्य
पाणलोट क्षेत्रामधील देश महाराष्ट्र
ह्या नदीस मिळते प्रवरा

अढुळा नदी ही महाराष्ट्रातील नासिक जिल्ह्यातील एक नदी आहे. ही नदी अकोले गावाच्या उत्तरेस उगम पावते. ती पट्टा व महाकाली च्या उतारावरुन धावते.सुमारे १५ मैल (२४ किमी) पूर्वेकडे वाहते. यादरम्यान ती समशेरपूर दरीतून वाहते. ती नंतर सुमारे १५० फूट (४६ मी) खाली कोसळते व खडकाळ जमिनीतून वाहते. त्यानंतर ती संगमनेरजवळ समतल भागात पोचते व मग दक्षिणेकडे वळून मग प्रवरा नदीला मिळते.[१]

या नदीची एकूण लांबी सुमारे ४० किमी इतकी आहे. पावसाळ्यात या नदीला फारच त्वरेने पूर येतो.याचे कारण ती डोंगराळ प्रदेशातून वाहते व तिचा प्रवाह वेगवान आहे. समशेरपूर या गावानंतर या नदीवर अनेक बंधारे व सांडवे बांधण्यात आले आहेत ज्यायोगे या नदीचे पाण्याचा वापर सिंचनासाठी होतो.[२]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ[संपादन]