Jump to content

म्हाळुंगी नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
म्हाळुंगी
इतर नावे म्हाळुंगी
उगम अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील म्हाळुंगी या गावात पूर्वेला असलेल्या सह्याद्रीच्या घनचक्कर रांगेत या नदीचा उगम होतो.
पाणलोट क्षेत्रामधील देश नाशिक ,अहमदनगर) महाराष्ट्र
लांबी ४१ किमी (२५ मैल)
ह्या नदीस मिळते (प्रवरा )
धरणे सोनेवाडी(भोजापुर धरण)प्रकल्प

म्हाळुंगी नदी ही महाराष्ट्रातील नाशिकअहमदनगर जिल्ह्यांतील एक नदी आहे. ही नदी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात म्हाळुंगी या गावात उगम पावते म्हणून तिला म्हाळुंगी नदी असे नाव पडले आहे.सिन्नर तालुक्यातील सोनेवाडी या गावात या नदीवर प्रकल्प आहे. पुढे ती नाशिक -अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातून वाहत जाऊन अहमद नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात प्रवेश करते. पुढे वाहत जाऊन ती संगमनेर शहरात प्रवरा नदीला मिळते. म्हाळुंगी नदी व प्रवरा नदी यांच्या संगमावर संगमनेर शहर वसलेले आहे.हे शहर अहमदनगर जिल्ह्यातील एक प्रमुख शहर आहे. याच शहरातून वाहणाऱ्या प्रवरा नदीची म्हाळुंगी ही प्रमुख उपनदी आहे. पुढे प्रवरा नदी गोदावरी या नदीस प्रवरासंगम येथे मिळते.