वाकी नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


नदी नाव = वाकी नदी (कृष्णवंती नदी )

|

| लेखनाव-वाकी नदी | अन्य_नावे = कृष्णवंती | उगम_स्थान_नाव = कळसुबाई शिखर, अकोले,अहमदनगर | उगम_उंची_मी = 822 फूट

| मुख_स्थान_नाव = | लांबी_किमी = 50 किमी | देश_राज्ये_नाव = भारत, महाराष्ट्र, अहमदनगर, अकोले | उपनदी_नाव = चिमण नदी, कच नदी | मुख्यनदी_नाव = प्रवरा | सरासरी_प्रवाह_घनमी_प्रतिसे = | पाणलोट_क्षेत्र_वर्ग_किमी = | धरण_नाव = वाकी बंधारा ही महाराष्ट्रातील अहमदनगर  जिल्ह्यातील  एक नदी आहे. ही नदी अहमदनगर व नाशिक जिल्हांच्या सीमेवर असणाऱ्या कळसुबाई या शिखराजवळ उगम पावते. या नदीचा उगम प्रत्यक्ष रित्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात होतो. या नदीच्या उगमस्थानाजवळील इगतपुरी येथे त्रिंगलवाडी किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी झंझराजाने बांधलेले  शंकराचे देऊळ आहे.ही नदी उगम क्षेत्रापासून 5 किमी अंतरानं अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात प्रवेश करते. कळसुबाई डोंगर रांगेत पडणाऱ्या पाऊसामुळे या नदीला दर वर्षी पावसाळ्यात पूर येतो.ही नदी प्रवरा नदीची एक लहान  उपनदी असून ती निळवंडे गावाच्या अलीकडे 2 किमी अंतरावर प्रवरेला मिळते. ही नदी अप्पर प्रवरा प्रकल्प म्हणजेच निळवंडे धरण पाणलोट क्षेत्रात येते. त्यामुळे या नदीच्या पुराचे पाणी प्रवरा नदीमार्गे या धरणात येते.