वैतरणा नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वैतरणा या पानावरून पुनर्निर्देशित)

वैतरणा नदी ही पालघर जिल्ह्यातून वाहते. ही त्र्यंबकेश्वरजवळ सह्याद्री पर्वतात उगम पावते. ही पश्चिम वाहिनी नदी अरबी समुद्राला मिळते. ही नदी त्र्यंबकेश्वराजवळच उगम पावणाऱ्या गोदावरीची उपनदी नाही. गोदावरी सह्याद्रीच्या पूर्वेला आहे, वैतरणा पश्चिमेला. हिच्यावर तीन धरणे आहेत. पहिले खालचे वैतरणा धरण (याला मोडक सागर म्हणतात), दुसरे मधले वैतरणा धरण (याला नाना शंकरशेट धरण म्हणतात) आणि तिसरे इगतपुरीजवळ असलेले वरचे वैतरणा धरण. या तीनही धरणांतून मुंबईला पाणी पुरवठा होतो. या नदीच्या सुर्या आणि तानसा या प्रमुख उपनद्या आहेत.

या धरणांव्यतिरिक्त मुंबईला पाणीपुरवठा करणारी, तानसा आणि भातसा हीही धरणे आहेत.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.