"इंदिरा गांधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ ८०: | ओळ ८०: | ||
१९७१ च्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने तत्कालीन पूर्व पाकिस्तानात जनतेवर अत्याचाराचे सत्र आरंभले. शेख मुजीबुर रेहमान हे पूर्व पाकिस्तानातून असल्यामुळेच बहुमत असूनही त्यांना पंतप्रधान होण्यापासून थांबवले गेले. पूर्व पाकिस्तानातून सुमारे १ कोटी निर्वासित भारतात आले. त्यांचा भार भारतावर पडत होता. तर पाकिस्तान भारतालाच दूषणे देत होता. दरम्यान अतिरेक्यांनी भारताच्या प्रवासी विमानाचे अपहरण करून ते पाकिस्तानात नेऊन जाळले. अखेर १९७१ च्या डिसेंबर मध्ये भारताने युद्धाची घोषणा केली. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी पाकिस्तानला पाठिंबा देत इंदिरा गांधींना संयुक्त राष्ट्राच्या कारवाईची धमकी देऊन पाहिली, पण इंदिरा गांधी बधल्या नाहीत. |
१९७१ च्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने तत्कालीन पूर्व पाकिस्तानात जनतेवर अत्याचाराचे सत्र आरंभले. शेख मुजीबुर रेहमान हे पूर्व पाकिस्तानातून असल्यामुळेच बहुमत असूनही त्यांना पंतप्रधान होण्यापासून थांबवले गेले. पूर्व पाकिस्तानातून सुमारे १ कोटी निर्वासित भारतात आले. त्यांचा भार भारतावर पडत होता. तर पाकिस्तान भारतालाच दूषणे देत होता. दरम्यान अतिरेक्यांनी भारताच्या प्रवासी विमानाचे अपहरण करून ते पाकिस्तानात नेऊन जाळले. अखेर १९७१ च्या डिसेंबर मध्ये भारताने युद्धाची घोषणा केली. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी पाकिस्तानला पाठिंबा देत इंदिरा गांधींना संयुक्त राष्ट्राच्या कारवाईची धमकी देऊन पाहिली, पण इंदिरा गांधी बधल्या नाहीत. |
||
==इंदिरा गांधी |
==इंदिरा गांधी यांचे चरित्रलेखक== |
||
* मदर इंडिया (मूळ इंग्रजी लेखक प्रणय गुप्ते, मराठी अनुवाद : पंढरीनाथ सावंत, रमेश दिघे) |
* मदर इंडिया (मूळ इंग्रजी लेखक प्रणय गुप्ते, मराठी अनुवाद : पंढरीनाथ सावंत, रमेश दिघे) |
||
* कॅथेरीन फ्रँक (मराठी अनुवाद - लीना सोहोनी) |
|||
* पुपुल जयकर (मराठी अनुवाद अशोक जैन) |
|||
* इंदर मल्होत्रा |
|||
==इंदिरा गांधी यांच्यावरील अन्य पुस्तके== |
==इंदिरा गांधी यांच्यावरील अन्य पुस्तके== |
२३:५१, २० ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती
इंदिरा गांधी | |
५ वी व ८ वी भारतीय पंतप्रधान
| |
कार्यकाळ जानेवारी १५ इ.स. १९८० – ऑक्टोबर ३१ इ.स. १९८४ | |
राष्ट्रपती | नीलम संजीव रेड्डी झैल सिंग |
---|---|
मागील | चौधरी चरण सिंग |
पुढील | राजीव गांधी |
कार्यकाळ जानेवारी १९ इ.स. १९६६ – मार्च २४ इ.स. १९७७ | |
राष्ट्रपती | सर्वपल्ली राधाकृष्णन, झाकीर हुसेन, वराहगिरी वेंकट गिरी, मोहम्मद हिदायत उल्लाह, वराहगिरी वेंकट गिरी आणि फक्रुद्दीन अली अहमद |
मागील | गुलजारी लाल नंदा |
पुढील | मोरारजी देसाई |
कार्यकाळ मार्च ९ इ.स. १९८४ – ऑक्टोबर ३१ इ.स. १९८४ | |
मागील | पी.व्ही. नरसिंहराव |
पुढील | राजीव गांधी |
कार्यकाळ ऑगस्ट २१ इ.स. १९६७ – मार्च १४ इ.स. १९६९ | |
मागील | एम.सी. छगला |
पुढील | दिनेश सिंह |
कार्यकाळ जून २६ इ.स. १९७० – एप्रिल २९ इ.स. १९७१ | |
मागील | मोरारजी देसाई |
पुढील | यशवंतराव चव्हाण |
जन्म | नोव्हेंबर १९, इ.स. १९१७ मुघलसराई |
मृत्यू | ऑक्टोबर ३१, इ.स. १९८४ नवी दिल्ली, भारत |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय कांग्रेस |
पती | फिरोज गांधी |
अपत्ये | राजीव गांधी आणि संजय गांधी |
निवास | १, सफदरजंग रोड, नवी दिल्ली |
धर्म | हिंदू |
इंदिरा गांधी (नोव्हेंबर १९,इ.स. १९१७ - ऑक्टोबर ३१,इ.स. १९८४) या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. बांग्लादेशच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनविण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता.
लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर पंतप्रधानपदाच्या प्राप्तीसाठी त्यांना मोरारजी देसाई यांच्याशी सामना करावा लागला. त्या १९६६ मध्ये देशाच्या पाचव्या पंतप्रधान (पहिल्या महिला पंतप्रधान) बनल्या. त्यांनी पोखरण येथे पहिली अणुचाचणी घडवून आणली.
इंदिरा गांधींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे झाला. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी लहानपणापासूनच भाग घेतला. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्यांनी काही स्वातंत्र्यसैनिकांच्या मदतीने अलाहाबादेतील मुलांची १९३० साली "वानर सेना' नावाची संघटना स्थापन केली. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९५५ मध्ये त्या काँग्रेस कृती समितीच्या व सेंट्रल पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्य झाल्या. फेब्रुवारी १९५९ मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून निवडून आल्या. केंद्रीय मंत्रिमंडळात त्या १९६४ साली प्रथम रुजू झाल्या. तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात माहिती व नभोवाणी मंत्री म्हणून त्यांनी त्यावेळी कार्य केले. लालबहादुर शास्त्री यांचा ताश्कंद येथे १९६६ मधे मृत्यू झाल्यानंतर कॉँग्रेस अध्यक्ष कामराज याच्या पाठिंब्याने १८६ मतांनी मोरारजी देसाई यांचा पराभव करून त्या २४ जानेवारी १९६६ रोजी श्रीमती इंदिरा गांधी प्रधानमंत्री म्हणून विजयी झाल्या. १४ प्रमुख व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण आणि पोखरण येथे पहिली अणुचाचणी, ऑपरेशन ब्लू स्टार या त्याच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना होत्या.
१९७७ साली त्यानी देशात आणीबाणी लागू करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला. यामुळे १९८० पर्यंत त्या सत्तेपासून दूर राहिल्या. १९८० च्या निवडणुकांत जनतेने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला. पण यावेळी त्यांना अशांत पंजाबचा सामना करावा लागला. ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा निर्णय खलिस्तान चळवळीला आळा घालण्यासाठी घेतला. पण अखेर त्यामुळेच त्यांच्या २ सुरक्षारक्षकांकडून त्यांची हत्या झाली.
बालपण
जवाहरलाल आणि कमला या नेहरु दाम्पत्याचे इंदिरा गांधी हे एकमेव अपत्य होते. १९ नोव्हेंबर १९१७ ला इंदिराचा जन्म झाला. मुळात नेहरु हे काश्मिरी पंडित होते. इंदिरांचे आजोबा मोतीलाल नेहरु व्यवसायाने वकील आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आघाडीचे नेते होते. भारताच्या राजकारणात त्यांना मानाचे स्थान होते. ते स्वरूप राणी यांसोबत विवाह करून अलाहाबाद येथे स्थायिक झाले. जवाहरलाल नेहरोइओ यांचे शिक्षण इंग्लंड मध्ये झाले, पुढे ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले अतिशय लोकप्रिय, महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले. तसेच स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधानही बनले. इंदिरा गांधींचे बालपण आपल्या घराच्या स्वातंत्र्य लढ्याच्या संस्कारांतच झाले. पुढे त्यांनी लहान मुलामुलींची वानरसेना चळवळ सुरू केली. निदर्शने, मोर्चे काढणे, बंदी घातलेल्या गोष्टींची वाहतूक करणे वगैरे गोष्टी ही सेना करीत असे.
१९३६ मध्ये इंदिरा गांधी यांच्या आई कमला नेहरू यांचे दीर्घ आजाराने देहावसान झाले. यावेळी इंदिरा गांधींचे वय केवळ १८ होते. त्यांचे शिक्षण सोमरविले कॉलेज, ऑक्सफर्ड विद्यापीठ येथे झाले.[१] याच दरम्यान त्या लंडनमधील इंडिया लीगच्या सदस्या झाल्या. १९४० च्या दशकात इंदिरा गांधींनी फुप्फुसाच्या आजारातून बरे होण्यासाठी काही काळ स्वित्झर्लंड मध्ये व्यतीत केला. याच दरम्यान जवाहरलाल यांनी इंदिरा गांधींना लिहलेली पत्रे प्रसिद्ध आहेत. युरोपातल्या वास्तव्यादरम्यानच त्यांची ओळख फिरोज गांधी या तरुणाशी झाली. ही ओळख नंतर प्रेमात बदलून अखेर त्या दोघांनी विवाह केला.
फिरोज गांधींसोबत विवाह
इंदिरा गांधींनी इतक्यातच लग्न करू नये म्हणत जवाहरलाल नेहरु यांनी त्यास विरोध केला. पण इंदिरा ठाम होत्या व त्यांनी मार्च १९४२ मध्ये विवाह केला. फिरोज गांधींसुद्धा राजकारणात सक्रिय होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे फिरोज व इंदिरा दोघे सदस्य होते. १९४२ च्या लढ्यात भाग घेतला म्हणून दोघांना अटक झाली होती. फिरोज गांधीं हे स्वातंत्र्यानंतर उत्तर प्रदेशातून संसदेवर निवडून गेले होते. या दांपत्याला राजीव व संजय अशी दोन मुले झाली. पण त्यानंतर दोघात दुरावा येत गेला. दरम्यानच्या काळात फिरोज गांधींना हृदय विकाराचा झटका आला. अखेर १९६० मध्ये फिरोज गांधींचा मृत्यू झाला.
राजकारणातला प्रवास
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष पद:
१९५९ मध्ये इंदिरा गांधींनी निवडणुकीत भाग घेतला. आणि त्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या.
माहिती व नभोवाणी मंत्री: जवाहरलाल नेहरूंच्या मृत्युनंतर लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. यात त्यांनी माहिती व नभोवाणीमंत्री हे पद सांभाळले. याचदरम्यान त्यावेळच्या मद्रास राज्यात हिंदीला राष्ट्रीय भाषा घोषित करण्याविरोधात दंगे उसळले होते. तेव्हा त्यांनी मद्रासला भेट दिली. सरकारी अधिकारी, सामाजिक नेते यांची भेट घेउन राग शांत करण्याचा प्रयत्न केला. १९६५ चे भारत-पाक युद्ध या दरम्यान त्या श्रीनगर च्या आसपास सुट्या व्यतीत करत होत्या. पाकिस्तानी सैन्य फार जवळ पोहोचले आहे असे संदेश भारतीय सैन्याकडून मिळूनही त्यांनी जम्मू अथवा दिल्ली येथे जाण्यास नकार दिला. अशा प्रकारच्या धाडसी कामांमुळे त्यांची लोकप्रिय छबी निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या.
पाकचे आक्रमण परतून लावण्यात भारताला यश आले. १९६६ च्या जानेवारी महिन्यात तत्कालीन सोव्हियत संघात ताश्कंद येथे पाकिस्तानचे अयुब खान आणि लालबहादुर शास्त्री यात शांती समझोता झाला. पण त्यानंतर काही तासातच त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये पंतप्रधान पदासाठी स्पर्धाच सुरू झाली. मोरारजी देसाई यांनी आपला अर्ज भरला. पण तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष कामराज यांनी अंतर्गत राजकारणातून इंदिरा गांधीना पाठिंबा दिला. ३५५ विरुद्ध १६९ मतांनी विजय मिळवला. त्या भारताच्या पाचव्या पंतप्रधान आणि पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या.
पंतप्रधान
इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्याझाल्या काँग्रेसमध्ये फूट पडली. राममनोहर लोहिया हे त्यांना गुंगी गुडिया म्हणून संबोधायचे. अखेर १९६७ च्या निवडणुकात काँग्रेसचे ६० जागांचे नुकसान झाले. ५४५ पैकी २९७ जागांवर विजय मिळवून सत्ता मिळाली. मोरारजी देसाई यांना उपपंतप्रधानपद आणि अर्थमंत्री पद द्यावे लागले. तरी अखेर १९६९ मध्ये मोरारजी सोबतच्या वादांनी काँग्रेसची २ शकले झाली. इतर पक्षांचा पाठिंबा मिळवून त्यांनी सरकार वाचवले.
जुलै १९६९ मध्येच त्यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले.
१९७१ चे भारत पाक युद्घ
मुख्य पानः भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध
१९७१ च्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने तत्कालीन पूर्व पाकिस्तानात जनतेवर अत्याचाराचे सत्र आरंभले. शेख मुजीबुर रेहमान हे पूर्व पाकिस्तानातून असल्यामुळेच बहुमत असूनही त्यांना पंतप्रधान होण्यापासून थांबवले गेले. पूर्व पाकिस्तानातून सुमारे १ कोटी निर्वासित भारतात आले. त्यांचा भार भारतावर पडत होता. तर पाकिस्तान भारतालाच दूषणे देत होता. दरम्यान अतिरेक्यांनी भारताच्या प्रवासी विमानाचे अपहरण करून ते पाकिस्तानात नेऊन जाळले. अखेर १९७१ च्या डिसेंबर मध्ये भारताने युद्धाची घोषणा केली. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी पाकिस्तानला पाठिंबा देत इंदिरा गांधींना संयुक्त राष्ट्राच्या कारवाईची धमकी देऊन पाहिली, पण इंदिरा गांधी बधल्या नाहीत.
इंदिरा गांधी यांचे चरित्रलेखक
- मदर इंडिया (मूळ इंग्रजी लेखक प्रणय गुप्ते, मराठी अनुवाद : पंढरीनाथ सावंत, रमेश दिघे)
- कॅथेरीन फ्रँक (मराठी अनुवाद - लीना सोहोनी)
- पुपुल जयकर (मराठी अनुवाद अशोक जैन)
- इंदर मल्होत्रा
इंदिरा गांधी यांच्यावरील अन्य पुस्तके
- The Unseen Indira Gandhi (लेख्क - डॉ. के.पी. माथुर)
इंदिरा गांधी यांच्या नावाच्या संस्था
- पहा : गांधी नावाच्या संस्था
टपालाचे तिकीट
इंदिरा गांधी यांची छबी असलेले पाच रुपये किमतीचे टपालाचे तिकीट होते. सप्टेंबर २०१५ पासून त्याची छपाई बंद करण्यात आली. .
मागील: चरणसिंग चौधरी |
भारतीय पंतप्रधान जानेवारी १४, इ.स. १९८० – ऑक्टोबर ३१, इ.स. १९८४ |
पुढील: राजीव गांधी |
संदर्भ
- ^ (इंग्रजी भाषेत) http://news.bbc.co.uk/local/oxford/hi/people_and_places/arts_and_culture/newsid_8661000/8661776.stm. ३१ ऑक्टोबर, २०१२ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य)
- CS1 errors: dates
- भारतरत्न पुरस्कार
- भारतीय अर्थमंत्री
- भारताचे पंतप्रधान
- भारतीय परराष्ट्रमंत्री
- भारतीय माहिती आणि प्रसारणमंत्री
- भारतरत्न पुरस्कारविजेते
- इ.स. १९१७ मधील जन्म
- इ.स. १९८४ मधील मृत्यू
- ४ थी लोकसभा सदस्य
- ५ वी लोकसभा सदस्य
- ६ वी लोकसभा सदस्य
- ७ वी लोकसभा सदस्य
- रायबरेलीचे खासदार
- मेडकचे खासदार
- चिकमागळूरचे खासदार
- राज्यसभा सदस्य
- नेहरू-गांधी परिवार
- भारतीय राजकारणी
- हत्या झालेले भारतीय राजकारणी
- पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती