विकिपीडिया:विकिप्रकल्प गणित/चालू कामे
Appearance
|
कार्यप्रस्ताव २०१२-०३-१७
[संपादन]- उद्दिष्ट: गणित विषयावरील खाली दिलेल्या सूचीतील लेखांचे किमान प्रस्तावना लिहून नोंदवलेल्या विस्तारीकरण करणे. यात ढोबळ मानाने खालील निकष पुरे करायचे आहेत :
- लेखविषयाबद्दल परिचयात्मक पहिला परिच्छेद खालील उपनिकषांनुसार पुरा करणे.
- विषयाचे मराठीतील नाव, मराठीतील अन्य नामभेद, इंग्लिश भाषेतील नाव (काही मराठी भाषकांना इंग्लिश नावे अभ्यासक्रमाद्वारे माहीत असल्यामुळे) नोंदवणे.
- लेखविषय जर गणिती संकल्पनेविषयी असेल, तर त्या संकल्पनेची व्याख्या/संक्षिप्त वर्णन लिहिणे.
- लेखाच्या मुख्य विषयाशी संबंधित असलेल्या उपलब्ध लेखांचे विकिदुवे देणे
- लेखाच्या मुख्य विषयाशी संबंधित एखादे चित्र/आकृती टाकणे (टाकलीच पाहिजे असे नाही.).
- कॉमन्सावरील संचिका वर्गाचा दुवा व अन्य बाह्य दुवे नोंदवणे.
- बाह्य दुव्यांचे आणि संदर्भांचे मराठीकरण प्राधान्याने करावे. तसेच बाह्य दुवे आणि संदर्भ नोंदवताना साचा:स्रोत संकेतस्थळ, साचा:स्रोत पुस्तक इत्यादी संदर्भसाच्यांचा वापर करावा.
- प्रस्ताव मांडणारा/री सदस्य: संकल्प द्रविड (चर्चा | योगदान)
- समन्वयक: संकल्प द्रविड (चर्चा | योगदान)
- सहभागी सदस्य: संकल्प द्रविड (चर्चा | योगदान)
- कालावधी: सध्या या विकिप्रकल्पाचा आवाका व सहभागी सदस्य यांतील गुणोत्तर व्यस्त असल्यामुळे तूर्तास बेमुदत कालावधी ठेवावा. भविष्यात या कार्यप्रस्तावास अन्य सदस्यांचा सहभाग लाभला, तर सहमतीने कालावधी ठरवून येथे नोंदवावा.
- या आधीच्या मुदतवाढी: गैरलागू.
- सद्यस्थिती