फल (गणित)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कार्टेशी प्रतलावरील आलेखाच्या स्वरूपात दर्शवलेले फलाचे स्वरूप : यात आडव्या अक्षावर x हे निविष्टी असलेले स्वचल परिमाण असून उभ्या अक्षावर त्याची f(x) ही फलनिष्पत्ती दर्शवली आहे. तांबड्या रेघेने दर्शवलेला आलेख f हे फल दर्शवतो.

गणितामध्ये फल[१][२] (मराठी नामभेद: फलन ; इंग्लिश: Function, फंक्शन) म्हणजे दोन परिमाणांमधील परस्परसंबंध दर्शवणारे समीकरण होय. यात एक परिमाण (ज्यास स्वचल परिमाण असे म्हणतात) दुसऱ्या परिमाणाचे (ज्यास परचल परिमाण असे म्हणतात) फल असते. गणिती सूत्रांमध्ये मांडताना, x हे स्वचल परिमाण निविष्टी असलेल्या f या फलाची निष्पत्ती f(x) या चिन्हाद्वारे लिहिली जाते. फलाची ही निष्पत्ती y हे परचल परिमाण मानल्यास, स्वचल व परचल परिमाणांतील फलाच्या स्वरूपातला परस्परसंबंध खालील सूत्राद्वारे मांडला जातो :


संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. (इ.स. १९९७) गणितशास्त्र परिभाषा कोश. भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन, पृ. ११३. (मराठी मजकूर) 
  2. (इ.स. १९६९) परांजपे,गो.रा.: वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा. महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ, पृ. १२०. (मराठी मजकूर) 


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.