अदिश गुणाकार
Appearance
गणितामध्ये अदिश गुणाकार ही द्विक्रिया असून त्याचे सामान्यतः दोन प्रकार पडतात:
- १) सदिशांचा अदिश गुणाकार - बिंदू गुणाकार. ह्या प्रकारात दोन सदिशांचा गुणाकार - एका सदिशाने दुसऱ्या सदिशाला गुणल्यावर येणारा गुणाकार अदिश असतो म्हणून ह्यास अदिश गुणाकार असेही म्हणतात.
- २) एखाद्या सदिशास किंवा सारणीस किंवा सदिश अवकाशातील घटकास सामान्य अदिशाने गुणणे म्हण्जेच त्या अदिशाच्या पटीत वाढविणे ह्या क्रियेस अदिश गुणाकार म्हणतात. ह्या क्रियेस अदिशाकडून गुणाकार असेही म्हणतात.