पदावली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बीजगणितानुसार पदावली (मराठी लेखनभेद: पदावलि [१]; इंग्लिश: Expression, एक्सप्रेशन ;) म्हणजे गणिती चिन्हांची व बैजिक चिन्हांची सान्त रचना असते[१]. पदावल्यांच्या घटकांमध्ये स्थिरांक व चलांक इत्यादी गणिती चिन्हे/राशी, तसेच क्रिया व संबंध दर्शवणारी बैजिक चिन्हे मोडतात. पदावल्या अंकगणितातील एखाद्या सोप्या क्रियांपासून बनलेल्या असू शकतात, उदा.:

3+5\times\left((-2)^7-\frac32\right)

, किंवा चलांक, फल, क्रमचय, योगफल, विकलकसंकलक यांपासून बनलेल्या जटिल मांडण्या असू शकतात. उदा.:

f(a)+\sum_{k=1}^n\left.\frac{1}{k!}\frac{d^k}{dt^k}\right|_{t=0}f(u(t))\ +\ \int_0^1 \frac{(1-t)^n }{n!} \frac{d^{n+1}}{dt^{n+1}} f(u(t))\, dt.

सर्वसाधारणपणे पाहिल्यास पदावल्यांना सामान्य अंकगणितीय क्रियांचे संख्या, चल व गणितीय क्रिया या घटकांपासून बनवलेले सरलीकृत रूप मानता येईल. उदाहरणार्थ :

रेषीय पदावली: 8x-5.

द्विघात पदावली: 7{{x}^{2}}+4x-10.

गुणोत्तरीय पदावली: \frac{x-1}{{{x}^{2}}+12}.

गणितीय पदावलीच्या रचनेचे नियम न पाळता लिहिलेल्या बैजिक चिन्हांच्या व चलांच्या माळेस मात्र पदावली असे म्हणता येत नाही. उदाहरणार्थ :

\times4)x+,/y

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. १.० १.१ (इ.स. १९६९) परांजपे, गो.रा.: वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा. महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ, पृ. ११०. (मराठी मजकूर) 


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.