परिमेय संख्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
परिमेय संख्यांचा संच दर्शवण्यासाठी वापरले जाणारे चिन्ह.

परिमेय संख्या [१] (इंग्लिश: Rational number, रॅशनल नंबर) म्हणजे एखादा पूर्णांक आणि एखादा शून्येतर पूर्णांक यांच्यातल्या / अशा गुणोत्तराच्या स्वरूपात लिहिल्या जाणाऱ्या संख्यांना उद्देशून वापरली जाणारी संज्ञा होय. परिमेय संख्यांच्या या गुणोत्तर स्वरूपातील विशेष बाब ही, की त्याच्या छेदातील हा पूर्णांक कदापि शून्य नसतो. अर्थात पूर्णांकाचे मूल्य असू शकते; म्हणूनच प्रत्येक पूर्ण संख्या ही परिमेय संख्यादेखील असते. शून्यास कोणत्याही पूर्ण संख्येने भागले असता उत्तर शून्यच येते; त्यामुळे शून्यासही परिमेय संख्यांत गणले जाते.

परिमेय संख्यांचा संच[श १] ठळक टायपातल्या Q या रोमन वर्णाक्षराने (किंवा ब्लॅकबोर्ड ठळक टायपातल्या , युनिकोड U+211A ), दर्शवतात. लॅटिन भाषेतल्या "कोशंट" (लॅटिन: Quotient) या शब्दातील "क्यू" या वर्णाक्षरावरून हे चिन्ह आले आहे.

या संख्या भौमितिक प्रतलावर अचूक मांडता येतात.

पारिभाषिक शब्द[संपादन]

  1. ^ संच (इंग्लिश: Set, सेट). संख्यांचा समूह.

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ गणितशास्त्र परिभाषा कोश. p. २०५.