पॅरेटो तत्त्व

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जगातील अनेक घटनांमध्ये, (साधारण) ८० % परिणाम हे (साधारण) २० % कारणांमुळे होतात असा नियम. .

इटालियन अर्थशास्त्रज्ञ विल्फ्रेडो पॅरेटो याने प्रथम असे निरिक्षण केले की जगातील ८० % संपत्ती ही केवळ २० % लोकांकडेच आहे.

जगात अनेक क्षेत्रांमध्ये हा नियम लागू असल्याचे आपल्याला दिसून येते.

उदा.
१. आपण आपला ८० % वेळ २० % लोकांबरोबर घालवतो.

२. उत्पादनातील ८० % त्रुटी या २० % दोषांमुळे निर्माण होतात.

३. आपला ८० % फायदा हा २० % ग्राहकांमुळे होतो.

४. ८० % ग्राहक हे २० % वेळामध्ये येतात.

या नियमाचा दैनंदिन जीवनात वापर केल्यास अनेक गोष्टी सुकर होतात.


पॅरेटो तत्त्व