सेंट पीटर्सबर्ग
Appearance
(लेनिनग्रॅड या पानावरून पुनर्निर्देशित)
सेंट पीटर्सबर्ग Санкт-Петербург |
|||
रशियामधील शहर | |||
| |||
देश | रशिया | ||
जिल्हा | वायव्य | ||
स्थापना वर्ष | २७ मे इ.स. १७०३ | ||
क्षेत्रफळ | १,४३९ चौ. किमी (५५६ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | ४८,४८,७०० | ||
प्रमाणवेळ | मॉस्को प्रमाणवेळ |
सेंट पीटर्सबर्ग (रशियन: Санкт-Петербург) हे रशिया देशाच्या वायव्य भागातील एक प्रमुख शहर आहे.
ह्या शहराची स्थापना झार पीटर द ग्रेटने २७ मे १७०३ रोजी केली. इ.स. १७१३ ते १७२८ व इ.स. १७३२ ते १९१८ ह्या दरम्यान सेंट पीटर्सबर्ग ही रशियन साम्राज्याची राजधानी होती. १९१४ साली ह्या शहराचे नाव पेट्रोग्राड (रशियन: Петроград), व १९२४ साली लेनिनग्राड (रशियन: Ленинград) ठेवण्यात आले. १९९२ साली सेंट पीटर्सबर्ग हे मूळ नाव पुन्हा शासकीय वापरात आणले गेले.
नेव्हा नदीवर व फिनलंडच्या आखाताच्या मुखाजवळ वसलेले सेंट पीटर्सबर्ग हे रशियातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर व बाल्टिक समुद्रावरील महत्त्वाचे बंदर आहे. येथील पुल्कोवो विमानतळ रशियामधील तिसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत