रेल चाक कारखाना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रेल व्हील फॅक्टरी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

रेल चाक कारखाना (इंग्लिश: Rail Wheel Factory) हा भारतीय रेल्वेचा एक कारखाना आहे. बंगळूरच्या येळहंका भागात स्थित असलेल्या ह्या कारखान्यामध्ये रेल्वेच्या इंजिन, प्रवासी तसेच मालवाहतूक डबे इत्यादींमध्ये वापरात येणारी सर्व प्रकारची चाके, आस (Axle) व निगडीत भाग बनवण्यात येतात.

१९७०च्या दशकाअखेरीस भारतीय रेल्वे आवश्यक असलेल्या चाकांपैकी ५५ टक्के चाके आयात करीत असे. भारतीय कंपन्यांपैकी केवळ टाटा लोह व स्टील कंपनी व दुर्गापूर स्टील कारखाना ह्या दोनच कंपन्या रेल्वेची चाके बनवीत असत. महागड्या आयत दरामुळे नुकसान होत असल्यामुळे भारत सरकारने स्वत:चा चाक कारखाना उघडण्याचा निर्णय घेतला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांनी १५ सप्टेंबर १९८४ रोजी रेल चाक कारखान्याचे उद्घाटन केले.

बाह्य दुवे[संपादन]

गुणक: 13°06′05″N 77°35′15″E / 13.10149°N 77.58755°E / 13.10149; 77.58755