नंदिनी नदी
![]() |
नंदिनी नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.
हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
|
नंदिनी नदी | |
---|---|
पाणलोट क्षेत्रामधील देश | नासिक (महाराष्ट्र), भारत |
नंदिनी नदी (किंवा नासर्डी नदी) ही महाराष्ट्रातील नासिक जिल्ह्यातील एक नदी आहे. या ’नंदिनी’व्यतिरिक्त, भारताच्या उत्तराखंड, कर्नाटक, झारखंड आणि राजस्थान या राज्यांत नंदिनी नावाच्या नद्या आहेत. नंदिनी हे गंगा नदीचेही एक नाव आहे.
नाशिक जवळच्या या नंदिनी नदीच्या काठी वसलेल्या टाकळी या गावी रामदासस्वामींनी तपश्चर्या केली. नाशिकमध्ये आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी (समर्थ)रामदास हे नाव धारण केले. टाकळी येथे ते, इ.स. १६२१ ते १६३३ असे १२ वर्षे राहिले. आपल्या या साधनेसाठी त्यांनी टाकळीची निवड करण्यामागे येथील नंदिनी नदीच्या काठावरील उंच टेकाडावरील घळ किंवा गुहा येथे असलेला एकांत हेच कारण असावे. या तपःसाधनेच्या कालावधीमध्ये ते पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून रोज १२०० सूर्यनमस्कार घालीत असत. सूर्योदयापासून माध्याह्नापर्यंत नदीच्या डोहात छातीइतक्या पाण्यात उभे राहून गायत्री मंत्राचे पुरश्चरण करत. दोन तास गायत्री मंत्राचा, तर चार तास रामनामाचा जप करीत. म्हणजे सहा तास नामस्मरण घडत असे. रामदासांनी रामनामाचे १३ कोटी वेळा नामस्मरण करून झाल्यावर अवतार कार्याला आरंभ केला, असे म्हणतात.
सद्यस्थिती[संपादन]
नंदिनी ही गोदावरीप्रमाणेच नाशिकच्या मध्यवस्तीतून वाहणारी नदी आहे. महिरावणी ते आगरटाकळी या सुमारे पंचवीस किलोमीटरच्या मार्गावर तिच्या पात्रात अनेक गावे, वस्त्या, झोपडपट्ट्या आणि नागरी वसाहतींचे मलजल, सांडपाणी मोठ्या प्रमाणात मिसळते. पावसाळ्यात मोठा पाऊस झाला, तरच भरून वाहणाऱ्या या नदीची अवस्था एरवी नाल्यासारखीच झाली आहे. दोन्ही काठांवर झोपडपट्ट्या आणि वस्त्यांचे अतिक्रमण झाल्याने तिच्या पात्राचा संकोच झाला आहे.
अतिक्रमणांच्या वेढ्यात दबलेली आणि सांडपाणी गटारीसारखे वाहून नेण्यापुरती उरलेली नंदिनी भविष्यात नाशिक शहरापुढे मोठे संकट निर्माण करण्याची चिन्हे आहेत. तिच्या पात्राचा संकोच आणि प्रदूषणाकडे झालेले दुर्लक्ष नागरिकांसाठी जीवघेणे ठरू शकते. ही नदी शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहत आगरटाकळी येथे गोदावरीत मिसळते. या ठिकाणाला "टाकळी संगम' म्हटले जाते. पण, दोन्ही नद्यांच्या या भेटीला प्रदूषणाचा काळाकुट्ट डाग लागला आहे. नंदिनीचे कमालीचे घाण आणि गटारीसारखे काळे पाणी ’नदी' म्हणून गोदेत मिसळते. त्यामुळे संगमाच्या अलीकडे निळसर दिसणारी गोदावरी या ठिकाणी मात्र पूर्णपणे काळीठिक्कर पडली आहे.
नंदिनी नदीच्या परिसरातील जूने नैसर्गिक नाले, ओढे नविन बांधकामात व्यवस्थित बूजवण्यात आले परिणामी जवळ जवळ परिसरातील सर्व सोसायट्या आणि सिटी सेंट्रल माॅलच्या चौकात पावसात पाणी साचते. त्यातून अपघात ही होतात. भविष्यात नंदिनी परिसराला नक्की पुराच्या संकटात नेईल...नदीच्या पुनरुज्जीवनासाठी पावसाच्या पाण्याच्या यथायोग्य निचरयाच्या (storm water management) व्यवस्था करावी लागेल...आत्ताच जागे झाल्यास भविष्यातील आपत्तीची जोखीम कमी करता येईल
पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या
अडुळा नदी · अळवंड नदी · आरम नदी · आळंदी नदी · उंडओहोळ नदी · उनंदा नदी · कडवा नदी · कवेरा नदी · काश्यपी (कास) नदी · कोलथी नदी · खार्फ नदी · गिरणा नदी · गुई नदी · गोदावरी नदी · गोरडी नदी · चोंदी नदी · तान (सासू) नदी · तांबडी नदी · दमणगंगा (दावण) नदी · धामण नदी · नंदिनी (नासर्डी) नदी · नार नदी · पर्सुल नदी · पांझरा नदी · पार नदी · पिंपरी नदी · पिंपलाद नदी · पुणंद नदी · बाणगंगा नदी · बामटी (मान) नदी · बारीक नदी · बोरी नदी · भोखण नदी · मान (बामटी) नदी · मासा नदी · मुळी नदी · मोसम नदी · म्हाळुंगी नदी · वडाळी नदी · वाकी नदी · वाग नदी · वाल नदी · वालदेवी नदी · वैतरणा नदी · वैनत नदी · वोटकी नदी · सासू (तान) नदी
|
भारतातील नद्या | |
---|---|
प्रमुख नद्या | |
मध्यम नद्या | |
छोट्या नद्या |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा? |