गिरणा नदी
गिरणा नदी | |
---|---|
इतर नावे | गिरीजा |
उगम | चिराई |
पाणलोट क्षेत्रामधील देश | नाशिक जिल्हा,जळगाव जिल्हा, महाराष्ट्र राज्य, भारत |
लांबी | २४१.४०२ किमी (१५०.००० मैल) |
उपनद्या | तांबडी, आराम, मोसम नदी, पांझण, तितूर |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
उगम
[संपादन]गिरणा नदी ही भारत देशामधल्या महाराष्ट्र राज्यातील नदी आहे. ती नाशिक जिल्ह्यात सह्याद्री डोंगर रांगेमधील शिंदे (दिगर) ता सुरगाणा या गावी उगम पावते. ही नदी नाशिक जिल्ह्यात सुरुवातीला पूर्व दिशेला वाहते आणि नंतर जळगाव जिल्ह्यात उत्तरेकडे मार्ग बदलून तापी नदीला मिळते.
उपनद्या
[संपादन]वाटेत तांबडी, आराम, मालेगावजवळ मोसम आणि नंतर पांझण या प्रमुख नद्या मिळाल्यावर ती नांदगाव तालुक्याच्या सीमेवरून नैऋत्य दिशेने जळगाव जिल्ह्यात शिरते. चाळीसगाव तालुक्यातून भडगाव महालातील भडगावनंतर थोडे पूर्वेस गेल्यावर तिला तितूर नदी मिळते. मग भडगाव, पाचोरा, एरंडोल, जळगाव तालुक्यांच्या सीमांवरून जाऊन भुसावळ — सुरत लोहमार्गाच्या उत्तरेस वायव्येकडे व नंतर पश्चिमेकडे जाऊन अमळनेर, एरंडोल, जळगाव व चोपडा तालुक्यांच्या सीमांजवळ ती तापीस मिळते.
खोरे
[संपादन]गिरणा नदीच्या खोऱ्यातील जमीन उपजाऊ आहे व ती तीव्रतेने कसली जाते. गिरणेच्या खोऱ्यात भात, नागली, गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा व इतर द्विदल धान्ये, ऊस, भुईमूग, कापूस इत्यादी पिके होतात.
गिरणा-तांबडी संगमानंतर चणकापूर येथे व चाळीसगाव तालुक्यात जामदा येथे गिरणेवर बांध घालून कालवे काढलेले आहेत. तसेच गिरणा धरण हे धरणही प्रसिद्ध आहे. मालेगाव तालुक्यातील पांझण धरण योजनेचा फायदा मुख्यतः जळगाव जिल्ह्यालाच होणार आहे.
आगामी योजना - गिरणा नदीवर जळगाव जिल्ह्यामध्ये भारताचा पायलट प्रोजेक्ट म्हणून सात बलून बंधारे मंजूर आहेत. ते अंतिम टप्प्याच्या एका मंजूरीसाठी प्रस्तावित आहे . शेवटची एक मंजूरी मिळाल्यानंतर हे बलून बंधारे गिरणा नदीवर साकारले जातील. भडगाव पाचोरा जळगाव आदी ठिकाणी यांची जागा निश्चित करण्यात आली आहे. त्याचा फायदा परिसरातील शेतीला पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहे . सिंचनाचा शेकडो एकर बाग ओलिताखाली येऊन लवकरच या योजनेला सुरुवात होणार असल्याचे बोलले जात आहे.