Jump to content

निसर्गदत्त महाराज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

निसर्गदत्त महाराज (१७ एप्रिल १८९७ - ८ सप्टेंबर १९८१ ) हे अधुनिक युगातील एक ज्ञानी सत्पुरूष व नवनाथ संप्रदायाचे अद्वैतवादी तत्त्वज्ञानी गुरू होते. त्यांचे जन्मनाव मारुती शिवरामपंत कांबळी होते. त्यांच्या जन्मदिनी हनुमान जयंती असल्याने त्यांचे नाव मारुती असे ठेवण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कांदलगाव या लहानशा खेड्यात ते लहानाचे मोठे झाले. तरुणपणी ते अनेक गोष्टींवर चिंतन करत असत. गुरूंना भेटण्यापूर्वी अध्यात्मावर त्यांचा विश्वास नव्हता. दीक्षा घेऊन कोणास शरण जायचे नाही असे त्यांनी मनोमन ठरवले होते. []

एकेदिवशी सिद्धरामेश्वर महाराज त्यांच्या परिसरात आले असता निसर्गदत्त यांच्या एका मित्राने निसर्गदत्त यांची इच्छा नसतानाही त्यांना सोबत चलण्याची गळ घातली. त्यांच्या मित्राने आपल्यासोबत पुष्पहार व मिठाई घेतली आणि निसर्गदत्त यांना उत्तम पोशाख चढविण्यास सांगितले. निसर्गदत्त जेंव्हा आपले गुरू सिद्धरामेश्वर महाराज यांना भेटले, तेंव्हा गुरूंनी त्यांना आपले डोळे बंद करण्यास सांगितले आणि दीक्षा देण्यास सुरुवात केली. काहीवेळाने त्यांनी निसर्गदत्त यांना डोळे उघडण्यास सांगितले. त्यावेळी स्वतःत काही विस्फोट व्हावा तशी त्यांना अनुभूती झाली आणि त्या क्षणापासून त्यांचे आयुष्य बदलून गेले. []

  1. ^ पुस्तक : Consciousness and the Absolute : The Final Talks of Sri Nisargadatta Maharaj
  2. ^ पुस्तक : Consciousness and the Absolute : The Final Talks of Sri Nisargadatta Maharaj