Jump to content

निसर्गदत्त महाराज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

निसर्गदत्त महाराज (१७ एप्रिल १८९७ - ८ सप्टेंबर १९८१ ) हे आधुनिक युगातील एक ज्ञानी सत्पुरुष व नवनाथ संप्रदायाचे अद्वैतवादी तत्त्वज्ञानी गुरू होते. निसर्गदत्त महाराज यांचे जन्मनाव मारुती शिवरामपंत कांबळी होते. त्यांच्या जन्मदिनी हनुमान जयंती असल्याने त्यांचे नाव मारुती असे ठेवण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कांदळगाव या लहानशा खेड्यात ते लहानाचे मोठे झाले. त्यांच्या वडीलांचे एक मित्र जेंव्हा कधी धार्मिक गोष्टींवर भाष्य करीत तेंव्हा महाराज ते अगदी लक्षपूर्वक ऐकत आणि त्यावर चिंतन करत. लहानपणी त्यांची घरची परिस्थिती ही तशी बेताचीच होती. परंतु पुढे वडीलांचे निधन झाल्यानंतर जेंव्हा छोट्याशा शेतीवर उदरर्निवाह करणे अगदीच कठीण होऊ लागले, तेंव्हा ते आपल्या जेष्ठ बंधूंच्या मागोमाग मुंबईस आले. तिथे त्यांचा व्यवसाय भरभराटीस आला आणि त्यांना आर्थिक सुरक्षितता प्राप्त झाली. महाराजांचे आयुष्य हे इथवर सर्वसामान्य माणसाप्रमाणे सुरू होते. []

पुढे एकेदिवशी सिद्धरामेश्वर महाराज त्यांच्या परिसरात आले असता त्यांना भेटण्यासाठी निसर्गदत्त महाराज यांच्या एका मित्राने त्यांना सोबत चलण्याची गळ घातली. निसर्गदत्त महाराज जेंव्हा आपले गुरू सिद्धरामेश्वर महाराज यांना पहिल्यांदा भेटले, तेंव्हा सिद्धरामेश्वर महाराजांनी त्यांना दीक्षा दिली. त्या क्षणापासून निसर्गदत्त महाराज यांचे आयुष्य बदलून गेले. त्यांना स्वतःची नव्याने ओळख झाली. यानंतर महाराजांचे आपल्या व्यवसायाकडे फारसे लक्ष लागले नाही. त्यांची पावले आपसूक हिमालयकडे वळली, परंतु नंतर ते पुन्हा आपल्या घरी परतले. कारण ते ज्या चैतन्याच्या शोधात होते, ते त्यांना आधीच प्राप्त झाले होते. त्यांना आत्मसाक्षात्कार घडला होता. []

निसर्गदत्त महाराज हे जरी फारसे शिकले नसले, तरी त्यांच्याकडे अलौकिक ज्ञानदृष्टी होती. त्यांनी साधकांशी मराठीतून साधलेल्या प्रश्नोत्तररुपी संवादाचे इंग्लिश भाषांतर मॉरिस फ्रिडमन यांनी ‘आय ऍम दॅट’ या पुस्तकातून १९७३ साली जगापुढे आणले आणि महाराजांना जगभरात थोर तत्त्ववेत्ते म्हणून किर्ती प्राप्त झाली.

निसर्गदत्त महाराज यांची पुस्तके

[संपादन]

आय ऍम दॅट

  1. ^ पुस्तक : I Am That
  2. ^ पुस्तक : I Am That