Jump to content

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा अफगाणिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०२४-२५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा अफगाणिस्तान दौरा
(संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०२४-२५
अफगाणिस्तान
दक्षिण आफ्रिका
तारीख १८ – २२ सप्टेंबर २०२४
संघनायक हश्मतुल्लाह शहिदी टेंबा बावुमा[n १]
एकदिवसीय मालिका
निकाल अफगाणिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा रहमानुल्लाह गुरबाझ (१९४) एडन मार्करम (९२)
सर्वाधिक बळी राशिद खान (७) लुंगी न्गिदी (४)
मालिकावीर रहमानुल्लाह गुरबाझ (अ)

अफगाणिस्तान क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने सप्टेंबर २०२४ मध्ये संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला.[] या दौऱ्यात तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांचा समावेश होता. सर्व सामने शारजा क्रिकेट स्टेडियमवर खेळले गेले. दोन्ही संघांमधील ही पहिली द्विपक्षीय एकदिवसीय मालिका होती.

अफगाणिस्तानने पहिला एकदिवसीय सामना सहा गडी राखून जिंकला, दक्षिण आफ्रिकेवर हा त्यांचा पहिला एकदिवसीय विजय होता. रहमानुल्लाह गुरबाझच्या १०५ धावा आणि रशीद खानच्या १९ धावांतील ५ बळींच्या जोरावर यजमानांनी दुसरा एकदिवसीय सामना १७७ धावांनी जिंकला आणि दक्षिण आफ्रिकेवर पहिला मालिका विजय मिळवला. एडन मार्करामच्या नाबाद ६९ धावांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने तिसरा एकदिवसीय सामना ७ गडी राखून जिंकला.

खेळाडू

[संपादन]
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान[] दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका[]

१७ सप्टेंबर २०२४ रोजी, टेम्बा बावुमा आजारपणामुळे पहिल्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर पडला आणि एडन मार्करामला कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले.[]

एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला एकदिवसीय सामना

[संपादन]
१८ सप्टेंबर २०२४
१६:०० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१०६ (३३.३ षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
१०७/४ (२६ षटके)
वियान मल्डर ५२ (८४)
फझलहक फारूखी ४/३५ (७ षटके)
अफगाणिस्तान ६ गडी राखून विजयी
शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह
पंच: लँग्टन रुसेरे (झिम्बाब्वे) आणि इझातुल्लाह सफी (अफगाणिस्तान)
सामनावीर: फझलहक फारूखी (अफगाणिस्तान)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • जेसन स्मिथ (दक्षिण आफ्रिका) ने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमधील अफगाणिस्तानचा हा पहिला विजय ठरला.[]

२रा एकदिवसीय सामना

[संपादन]
२० सप्टेंबर २०२४
१६:०० (दि/रा)
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
३११/४ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१३४ (३४.२ षटके)
टेंबा बावुमा ३८ (४७)
राशिद खान ५/१९ (९ षटके)
अफगाणिस्तान १७७ धावांनी विजयी
शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह
पंच: अहमद शाह दुर्रानी (अफगाणिस्तान) आणि अहमद शाह पक्तीन (अफगाणिस्तान)
सामनावीर: राशिद खान (अफगाणिस्तान)
  • अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • नकाबा पीटर (दक्षिण आफ्रिका) ने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

३रा एकदिवसीय सामना

[संपादन]
२२ सप्टेंबर २०२४
१६:०० (दि/रा)
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१६९ (३४ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१७०/३ (३३ षटके)
एडन मार्करम ६९* (६७)
फरीद अहमद १/१७ (७ षटके)
दक्षिण आफ्रिका ७ गडी राखून विजयी
शारजा क्रिकेट स्टेडियम, शारजा
पंच: लँग्टन रुसेरे (झि) आणि इझातुल्लाह सफी (अ)
सामनावीर: रहमानुल्लाह गुरबाझ (अ)
  • अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली.
  • अब्दुल मलिकचे (अ) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण.

नोंदी

[संपादन]
  1. ^ पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये एडन मार्करमने दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केले.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "ACB to Host South Africa for a Three-Match ODI Series in September". Afghanistan Cricket Board. 31 July 2024 रोजी पाहिले.
  2. ^ "ACB Name Squad for the South Africa ODIs". Afghanistan Cricket Board. 12 September 2024 रोजी पाहिले.
  3. ^ "South Africa inject fresh blood for white-ball squads against Afghanistan and Ireland". ESPNcricinfo. 9 September 2024 रोजी पाहिले.
  4. ^ "Stand-in captain named with Temba Bavuma ruled out of first ODI against Afghanistan". International Cricket Council. 18 September 2024 रोजी पाहिले.
  5. ^ "Afghanistan script history with first ever win over South Africa". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 18 September 2024 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]