Jump to content

शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शारजा क्रिकेट स्टेडियम या पानावरून पुनर्निर्देशित)
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम
स्टेडियमचे दृष्य
मैदान माहिती
स्थान शारजा, संयुक्त अरब अमिराती
स्थापना १९८२
आसनक्षमता २७,०००

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम क.सा. ३१ जानेवारी २००२:
पाकिस्तान  वि. वेस्ट इंडीज
प्रथम ए.सा. ६ एप्रिल १९८४:
पाकिस्तान वि. श्रीलंका
शेवटचा बदल ३० एप्रिल २०१५
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम (अरबी: لشارقة جمعية ملعب الكريكيت) हे संयुक्त अरब अमिराती देशाच्या शारजा शहरामधील एक क्रिकेट स्टेडियम आहे. १९८० च्या दशकात बांधलेल्या या मैदानात नंतर अनेक सुधारणा झालेल्या आहेत. संयुक्त अरब अमिरातीमधील तीन क्रिकेट स्टेडियमपैकी हे एक आहे (इतर दोन: दुबईमधील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमअबु धाबीमधील शेख झायेद क्रिकेट स्टेडियम ).

येथे आशिया चषक, चँपियन्स चषक तसेच इतर अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन झाले आहे. पाकिस्तान क्रिकेट संघ आपले अनेक घरचे सामने येथे खेळतो. हे मैदान अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे अधिकृत घरचे मैदान आहे.

२०१४ इंडियन प्रीमियर लीगचे सुरुवातीचे काही साखळी सामने येथे खेळले गेले.