कोलंबो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोलंबो
කොළඹ
கொழும்பு
श्रीलंकामधील शहर
कोलंबो is located in श्रीलंका
कोलंबो
कोलंबो
कोलंबोचे श्रीलंकामधील स्थान

गुणक: 6°56′4″N 79°50′31″E / 6.93444°N 79.84194°E / 6.93444; 79.84194

देश श्रीलंका ध्वज श्रीलंका
प्रांत पश्चिम प्रांत
जिल्हा कोलंबो
क्षेत्रफळ ३७.३१ चौ. किमी (१४.४१ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ७,५२,९९३
  - घनता १७,३४४ /चौ. किमी (४४,९२० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३०
http://colombo.mc.gov.lk/


कोलंबो (सिंहला: කොළඹ, तमिळ: கொழும்பு) ही श्रीलंकेची सांस्कृतिक व आर्थिक राजधानी आणि देशातील सर्वात मोठे शहर आहे. १९७८ साली श्रीलंकेची राजधानी जवळच्या श्री जयवर्धनेपुरा कोट ह्या कोलंबोच्या उपनगरामध्ये हलवण्यात आली. कोलंबो शहर श्रीलंका बेटाच्या हिंदी महासागरावरील पश्चिम किनाऱ्यावर वसले आहे. कोलंबो शहराची लोकसंख्या ७.५ लाख इतकी तर महानगर कोलंबोची लोकसंख्या ६० लाख इतकी आहे.

भंडारनायके आंतरराष्ट्रीय विमानतळ हा श्रीलंकेमधील प्रमुख विमानतळ कोलंबोच्या ३५ किमी उत्तरेस असून श्रीलंकन एरलाइन्सचे मुख्यालय येथेच आहे. देशांतर्गत वाहतूकीसाठी श्रीलंका रेल्वेचे अनेक मार्ग कोलंबोला इतर शहरांसोबत जोडतात. येथील कोलंबो फोर्ट रेल्वे स्थानकावरून सर्व प्रमुख रेल्वेगाड्या सुटतात.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत