बंगालचा उपसागर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
बंगालचा उपसागर (बांग्ला: বঙ্গোপসাগর ; तमिळ: வங்காள விரிகுடா ; तेलुगू भाषा: బంగాళాఖాతము ; इंग्लिश: Bay of Bengal, बे ऑफ बंगाल) हा हिंदी महासागराच्या ईशान्येकडील भाग व्यापणारा व जगातील उपसागरांपैकी सर्वांत विस्तीर्ण उपसागर आहे. ढोबळमानाने त्रिकोणी आकाराचा हा उपसागर पश्चिमेकडे भारताची पूर्व किनारपट्टी, बांग्लादेशाची दक्षिण किनारपट्टी व श्रीलंका या भूभागांनी, तर पूर्वेकडे म्यानमाराची किनारपट्टी व भारताची अंदमान आणि निकोबार बेटे यांनी वेढला आहे. या उपसागराचे क्षेत्रफळ २१,७२,००० कि.मी.२ आहे
| क्रम | मथळा | मजकूर |
|---|---|---|
| १ | महासागर | हिंदी महासागर |
| २ | संबंधीत देश | भारत, बांगलादेश, थायलंड, श्रीलंका, इंडोनेशिया |
| ३ | महत्तम लांबी | २०९० किलोमीटर |
| ४ | महत्तम रुंदी | १६१० किलोमीटर |
| ५ | क्षेत्रफळ | २१,७२,००० किमी² |
| ६ | सरासरी खोली | २६०० मीटर |
| ७ | महत्तम खोली | ४६९४ मीटर |
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |