जगातील सात आश्चर्ये
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पुरातन काळातील सात आश्चर्ये (डावीकडून उजवीकडे, वरुन खाली): गिझाचा भव्य पिरॅमिड, बॅबिलॉनच्या अधांतरी बागा, आर्टेमिसचे देऊळ, ऑलिंपिया येथील झेऊसचा पुतळा, हेलिकारनॅसिस येथील कबर, र्होड्स बेटांवरील पुतळा व अलेक्झांड्रिया येथील दीपस्तंभ
जगातील सात आश्चर्ये ही पृथ्वीवरील अद्भुत (व काही अंशी काल्पनिक) अशा नैसर्गिक किंवा बांधल्या गेलेल्या ठिकाणे/वास्तू ह्यांची यादी आहे.
[संपादन] पुरातन काळातील सात आश्चर्ये
पुरातन काळातील सात आश्चर्ये मध्ये खालील आश्चर्यांचा समावेश होतो.
| आश्चर्य | निर्मितीची तारीख | निर्माणकर्ता | वैशिष्ट्य | नष्ट होण्याची तारीख | नष्ट होण्याची कारणे |
|---|---|---|---|---|---|
| गिझाचा भव्य पिरॅमिड | इ.स.पू. २५८४ ते २५६१ | इजिप्तचे नागरिक | खुफु राजाची कबर | अजूनही अस्तित्वात | |
| बॅबिलॉनच्या अधांतरी बागा | इ.स.पू. ६०५-५६२ | बॅबिलॉनचे नागरिक | २२ मी (७५ फूट) उंचीच्या अधांतरी बागा, पाणी देण्यासाठी रहाट, छतावर मोठे मोठे वृक्ष | इ.स.पू.च्या पहिल्या शतका नंतर | भूकंप |
| ऑलिंपिया येथील झेऊसचा पुतळा | इ.स.पू. ४६६-४५६(मंदिर) इ.स.पू. ४३५(पुतळा) | ग्रीसचे नागरिक | ४० फूट (१२ मी.) उंच. | इ.स. चे ५ वे शतक-इ.स. चे ६ वे शतक | माहित नाही, कदाचित आग किंवा भूकंप. |
| आर्टेमिसचे देऊळ | इ.स.पू. ५५० | लिडियाचे नागरिक | बांधण्यास १२० वर्षे लागली | इ.स.पू. ३५६(हेरोस्ट्रॉटस ने) | इ.स. ४०९ (गॉथ लोकांनी) जाळपोळ, लूटालूट |
| हेलिकारनॅसिस येथील कबर | इ.स.पू. ३५१ | पर्शियाचे नागरिक, ग्रीसचे नागरिक | ४५ मी (१३५ फूट) उंच, कबरींसाठीच्या मॉसोलम या प्रतिशब्दाच्या उत्त्पत्तीसाठी कारक | इ.स. १४९४ | भूकंपामुळे पडझड, व युरोपियन प्रवाशांनी केलेली नासधूस. |
| र्होड्स बेटांवरील पुतळा | इ.स.पू. २९२-२८० | ग्रीसचे नागरिक | हेलिऑस देवतेचा पुतळा, ३५ मी (११० फूट) उंच. | इ.स.पू. २२६ | भूकंप |
| अलेक्झांड्रिया येथील दीपस्तंभ | इ.स.पू. २८० | टोलेमी | १३५ मी. (४४० फूट) उंच | इ.स. १३०३-१४८० | भूकंप |
[संपादन] आधुनिक जगातील सात आश्चर्ये
२००७ साली जगभर झालेल्या मतदानातून खालील सात आधुनिक आश्चर्यांची निवड करण्यात आली.
| आश्चर्य | ठिकाण | चित्र |
|---|---|---|
| चिचेन इट्झा | ||
| ख्रिस्ट द रिडीमर | ||
| कलोसियम | ||
| चीनची भिंत | ||
| माचु पिच्चु | ||
| पेट्रा | ||
| ताज महाल | ||
| गिझाचा भव्य पिरॅमिड |