गिझाचा भव्य पिरॅमिड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गिझा येथील भव्य पिरॅमिड

गिझाचा भव्य पिरॅमिड हा गिझा (सध्याचे कैरो) येथील ३ पिरॅमिड्सपैकी सर्वांत जुना व सर्वांत मोठा पिरॅमिड आहे व पुरातन काळातील सात आश्चर्यांपैकी अस्तित्वात असलेले एकमेव आश्चर्य आहे.

हा पिरॅमिड इ.स. पूर्व २५६० साली बांधला गेला व येथे इजिप्तच्या चौथ्या घराण्यातील राजा कुफू ह्याची कबर आहे. हा पिरॅमिड नक्की कसा बांधला गेला असावा हे कोडे अजूनही उलघडलेले नाही व ह्या बाबत अनेक वास्तुशास्त्रज्ञांनी आपापले तर्क व्यक्त केले आहेत.

हेसुद्धा पाहा[संपादन]