एव्हरेस्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माउंट एव्हरेस्ट
center}}
कालापत्थरहून दिसणारे एव्हरेस्ट शिखर
माउंट एव्हरेस्ट is located in नेपाळ
माउंट एव्हरेस्ट
माउंट एव्हरेस्ट
माउंट एव्हरेस्टचे नेपाळ-तिबेट सीमेजवळील स्थान
उंची
२९,०२९ फूट (८,८४८.८६ मीटर)
उंचीमध्ये क्रमांक
ठिकाण
नेपाळ सागरमाथा अंचल, नेपाळ
चीन तिबेट, चीन
पर्वतरांग
हिमालय
गुणक
27°59′17″N 86°55′31″E / 27.98806°N 86.92528°E / 27.98806; 86.92528
पहिली चढाई
२९ मे १९५३
न्यूझीलंड एडमंड हिलरी
नेपाळ तेनसिंग नोर्गे
सोपा मार्ग
साउथ कोल


माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे. हिमालय पर्वतातील ह्या शिखराची उंची ८,८४८.८६ मीटर (२९,०३१.६९ फूट)[१] इतकी असून ते नेपाळचीन (तिबेट) ह्या देशांच्या सीमेजवळ आहे. नेपाळमध्ये याला सागरमाथा म्हणून ओळखतात तर तिबेट मध्ये चोमो लुंग्मा म्हणतात.

सन १८५६ मध्ये ब्रिटिश राजवटीमधील भारतीय सर्वेक्षण विभागाने घेतलेल्या त्रिमितीय सर्वेक्षणामध्ये ह्या शिखराची उंची २९,०२९ फूट इतकी निश्चित करण्यात आली. ह्या आधी हे शिखर पीक XV ह्या नावाने ओळखले जात होते. सर्वेक्षणानंतर राधानाथ सिकदार यांनी सिद्ध केले की हिमालयाचे १५ वे शिखर जगातील सर्वात उंच शिखर आहे, आणि त्याची समुद्रसपाटीपासून उंची २९००२ फूट इतकी आहे. या कामगिरीसाठी ब्रिटिश सरकारने राधानाथांचा गौरव केला होता. त्या वेळचे भारतीय सर्वेक्षण खात्याचे प्रमुख(सर्व्हेयर जनरल) ॲन्ड्‌ऱ्यू वॉ होते. त्यांनी आपल्या इ.स.१८४३ मध्ये निवृत्त झालेल्या साहेबाचे, म्हणजे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट यांचे नाव त्या शिखराला दिले. म्हणून त्या शिखराला इ.स.१८६५ पासून माउंट एव्हरेस्ट म्हणू लागले.

माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच पर्वत असल्याने जगातील सर्वच गिर्यारोहकांचे याला सर करण्याचे स्वप्न असते. अनेक गिर्यारोहक भरमसाठ किंमत मोजून (अंदाजे २५ हजार डॉलर प्रत्येकी) हे शिखर सर करण्याचा प्रयत्‍न करतात. माउंट एव्हरेस्ट हे अतिउंच शिखर असले तरी के२ अथवा कांचनगंगा ह्या इतर शिखरांच्या तुलनेत कमी अवघड आहे. इतर कोणत्याही ८,००० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या शिखरांपेक्षा एव्हरेस्टवर सर्वाधिक गिर्यारोहण चढाया झाल्या आहेत, तरीही अतिउंचीच्या त्रासामुळे खराब हवामानामुळे अनेक गिर्यारोहक मृत्युमुखी पडतात. या शिखरावर पहिली चढाई १९५३ मध्ये ब्रिटिश मोहिमेतील न्यू झीलंडचे एडमंड हिलरी व भारतीय-नेपाळी नागरिक शेर्पा तेनसिंग नोर्गे यांनी केली. त्यानंतर आजवर २,४३६ गिर्यारोहकांकडून ३,६७९ चढाया झाल्या आहेत.

नाव[संपादन]

एव्हरेस्ट भौगोलिक

नेपाळी भाषेत एव्हरेस्टचे नाव सगरमाथा [२] असे आहे. हा शब्द संस्कृत शब्द स्वर्गमाथाचा अपभ्रंश आहे. तिबेटी भाषेत त्याला चोमोलुंग्मा (विश्वाची माता) असे म्हणतात. चिनी भाषेत Zhūmùlǎngmǎ Fēng (珠穆朗玛峰) असे आहे.

सर जॉर्ज एव्हरेस्ट

सर जॉर्ज एव्हरेस्ट हे १८४० मध्ये ब्रिटिश सरकारतर्फे भारतात चालू असलेल्या अखिल भारतीय त्रिमितीय सर्वेक्षण प्रकल्पाचे प्रमुख होते. एव्हरेस्ट यांनी १८४१ मध्ये या पर्वत रांगांना अतिउंच रांगांमध्ये समाविष्ट केले. पहिल्या प्रथम याला पीक बी असे नामकरण केले. १८४८ मध्ये मोजणीचे काम पुढे सरकल्यावर याचे पीक XV असे नामकरण केले. कांचनगंगा पर्वताला तोवर सर्वात उंच शिखर मानण्यात येत होते. ॲन्ड्‌ऱ्यू वॉ यांनी सर्वेक्षण उपकरणे वापरून शिखराच्या उंचीची प्राथमिक मोजणी केली व त्यानंतर १८५२ मध्ये देहरादूनकोलकातामधील कार्यालयांनी गणिते केल्यावर पीक XVची उंची इतर कोणत्याही शिखरापेक्षा जास्त आढळली व त्‍यावर सर्वोच्च शिखर म्हणून शिक्कामोर्तब झाले.[३] १८५६मध्ये एव्हरेस्ट यांच्या कनिष्ठांनी या शिखराचे नाव माउंट एव्हरेस्ट ठेवावे असे सुचविले.

चीन, तिबेटनेपाळ यांनी आपापल्या परीने एव्हरेस्टला फक्त त्यांच्या नावाने संबोधले जावे असे प्रयत्‍न केले. परंतु इतर सर्व देशांत शिखराला एव्हरेस्ट याच नावाने ओळखले जाते. या शिखराचे नाव बदलून त्याची अचूक उंची मोजणाऱ्या राधानाथ सिकदार याचे नाव शिखराला द्यावे, असा एक ठराव, अटलबिहारी बाजपेयी हे भारताचे पंतप्रधान असताना विचारात घेतला गेला होता. पण तो मंजूर होण्यापूर्वीच भारताचे पंतप्रधान बदलले.

मोजमाप[संपादन]

एव्हरेस्टचे हवाई चित्र

सर्वप्रथम ॲन्ड्‌ऱ्यू वॉ यांनी १८५६ मध्ये घेतलेल्या सर्वेक्षणानुसार माउंट एव्हरेस्टची ( तत्कालीन पीक XVची)उंची २९,००२ फूट इतकी निश्चित करण्यात आली होती. याकामी राधानाथ सिकदार यांच्यासह अनेक भारतीय गणितज्ञ गुंतले होते व अनेक वर्षे गणिते करून हे मापन मांडले होते.

सर्वात अलीकडे एव्हरेस्टची उंची ८,८४८ मीटर इतकी उंची अधिकृतरीत्या निश्चित करण्यात आली आहे. तरीही अनेक मापनकर्त्यांच्या मापनांत तफावत आढळून येते. ९ ऑक्टोबर २००५ रोजी चीनने केलेल्या मोजणीप्रमाणे पर्वताची उंची ८,८४४.४३ मीटर ± ०.२१ मीटर इतकी नोंदवण्यात आली आहे.[४] ही उंची एव्हरेस्टवरील बर्फाच्या लादीची उंची वजा जिथे खडक जेथे संपतो तेथवरून काढली आहे. चिनी मापनकर्त्यांना लादीची उंची साधारणपणे ३.५ मीटर इतकी आढळली.[५] व खडक व बर्फाची लादी या दोघांची मिळून एकत्र उंची ८,८४८ इतकी निश्चित करण्यात आली आहे.

तुलना[संपादन]

एव्हरेस्ट हे जगातील समुद्रसपाटीपासूनची सर्वोच्च जागा आहे यात दुमत नाही. परंतु अनेक पर्वत असे आहेत की ज्यांची बेस कॅंप पासूनची उंची ही एव्हरेस्टच्या बेसकॅंप पेक्षा जास्त आहे. मौना की हा हवाईमधील पर्वत समुद्राच्या तळापासून उंचावतो व जवळपास १०,००० मीटर त्यांची उंची आहे, परंतु पाण्याखाली जवळपास ५,००० मीटर असल्याने प्रत्यक्षात समुद्रसपाटीवरील उंची एव्हरेस्टपेक्षा बरीच कमी आहे. (साधारणपणे ४,२०५ मीटर)[६]

जर बेसकॅंप पासूनची उंची ग्राह्य धरण्यात येत असेल तर अमेरिकेच्या अलास्का राज्यातील माउंट मॅककिन्ले हा पर्वत सर्वात उंच आहे.[६] हा पर्वत त्याच्या तळापासून ५,६०० मीटर इतका उंच आहे तर परंतु त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ६,१९३ मीटर इतकीच आहे.[७] तर एव्हरेस्टची दक्षिण बाजूकडील बेसकॅंपपासूनची उंची ४,६५० मीटर इतकी आहे.[८]

चढाईसाठी मार्ग[संपादन]

चोमो लोंजोमकालुएव्हरेस्टTibetan PlateauRong Riverचाङ्त्सेRongbuk GlacierNorth FaceEast Rongbuk GlacierNorth Col north ridge routeल्होत्सेनुप्त्सेSouth Col routeग्याचुङ काङचोयुचित्र:Himalaya annotated.jpg
अंतराळातून घेतलेल्या छायाचित्रात दक्षिणेकडील व उत्तरेकडील मार्ग अधोरेखित केला आहे.

माउंट एव्हरेस्ट वर चढाईसाठी दोन प्रमुख मार्ग आहेत. नेपाळच्या हद्दीत असलेली आग्नेयेकडील पर्वत रांग व तिबेटच्या हद्दीतली ईशान्येकडील रांग. या व्यतिरिक्त अजूनही मार्ग आहेत परंतु ते फारसे वापरले जात नाहीत.[९] या दोघां मार्गांपैकी आग्नेयेकडील मार्ग जास्ती सोपा व सोईस्कर आहे. त्यामुळेच गिर्यारोहकांच्या जास्ती पसंतीचा आहे. ह्याच मार्गाने सर एडमंड हिलरी व तेनसिंग नोर्गे यांनी १९५३ मध्ये पहिली चढाई केली होती.[९] चीनचे पाश्चिमात्य देशांशी कटू संबंध यामुळे देखील नेपाळ मार्गाचा जास्त वापर होतो.[१०]

अंतराळातून दिसणारा साउथ कोल व नोर्थ कोलचा मार्ग

चढाईसाठी सर्वोत्तम महिना मे हा गणला जातो. या काळात थंडी कमी झालेली असते. चढाईसाठी आवश्यक असलेला कडक बर्फ हिवाळ्यानंतर भरपूर असतो. तसेच हवामानातील बदलामुळे वाऱ्याची दिशा उत्तरेकडची होते व त्यामुळे पर्वतावरील सोसाट्याचा वारा कमी होतो.[११][१२] काहीवेळा मान्सूननंतरच्या काळात चढाईचे प्रयत्‍न होतात. परंतु, सोसाट्याचा वारा, मान्सूनमुळे पडलेला जास्तीचा व भुशभुशीत बर्फ व हवामानातील सातत्याचे बिघाड यामुळे चढाई अवघड होऊन बसते.

चढाया[संपादन]

सुरुवातीचे प्रयत्‍न[संपादन]

तिबेटच्या उत्तर बाजूने दिसणारे एव्हरेस्टचे दृश्य व रोंगबुक मॉनेस्ट्री

सन १८८५ मध्ये आल्पाईन क्लबचे अध्यक्ष क्लिंटन थॉमस डेंट यांनी आपल्या पुस्तकात अबोव्ह द स्नो लाइन या पुस्तकात एव्हरेस्टवर चढाई करणे शक्य आहे हे नमूद केले होते.[१३]

जॉर्ज मॅलरी यांनी १९२१ मध्ये उत्तरेकडील मार्गाचा शोध लावला. ही एव्हरेस्ट काबीज करायची मोहीम नव्हती तर एव्हरेस्ट चढण्याचे मार्ग कुठून असण्याची शक्यता आहे हे पडताळण्यास होती. मॅलरी यांनी आपल्या शोधकार्यात पार एव्हरेस्टच्या सोंडांपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. मॅलरी ही पहिली अशी व्यक्ती होती की ज्यांनी नॉर्थ कोल (७,००७ मी)वर पाऊल ठेवले. नॉर्थ कोलवरून त्यांनी पुढील रस्ता कसा असेल याची पडताळणी केली. त्यांची मोहीम इतक्या उंचीसाठी अद्ययावत नव्हती त्यामुळे त्यांना तेथून आवरते घ्यावे लागले.

पुढच्याच वर्षी सन १९२२ मध्ये ब्रिटिशांनी एव्हरेस्ट काबीज करायची मोहिम आखली. या मोहिमेत जॉर्ज फिंच यांनी भराभर चढत ८,००० मीटर पेक्षाही जास्त चढण केली व ८,००० मीटरपेक्षा अधिक चढाई करणारे ते पहिले ठरले. ही मोहीम जॉर्ज मॅलरी व ब्रिटिशांच्या अखिलाडू वृत्तीसाठी गाजली. मॅलरी व कर्नल फेलिक्स यांनी पुन्हा एकदा नॉर्थ कोलच्या बाजूने प्रयत्‍न केला. मॅलरी यांच्या चुकीमुळे हिमस्खलनामध्ये ७ स्थानिक वाहक मारले गेले.

१९२४ मध्ये मॅलोरी यांनी पुन्हा ब्रिटिशांनी मोहीम आखली. या मोहिमेत सुरुवातील मॅलरी व ब्रूस यांचे प्रयत्‍न खराब हवामानाने फोल ठरवले. पुढील प्रयत्‍न नॉर्टन व सॉमरवेल यांनी केले त्यांना सुरेख हवामानाची साथ मिळाली व त्यांनी विना ऑक्सिजन प्रयत्‍न केले. नॉर्टन ८,५५८ मीटर पोहोचले असताना मॅलरी व इर्व्हिन ह्यानी ऑक्सिजन देण्यासाठी म्हणून पुढाकार घेतला. नॉर्टनला बेसकॅंपकडे परत पाठवले व स्वतः मोहीमे फत्ते करायचे ठरवले. ८ जून १९२४ रोजी इर्व्हिन व मॅलरी चढाई करत असताना मरण पावले. १ मे १९९९ रोजी मॅलरी व इर्व्हिन फाउंडेशनच्या गिर्यारोहकांना एव्हरेस्ट शिखराच्या उत्तर बाजूला बर्फाच्या अस्तराखाली दफन झालेले मृतदेह शोधून काढण्यात यश मिळाले. शिखराच्या एवढे जवळ सापडलेल्या मृतदेहांमुळे इर्व्हिन व मॅलरी यांनी हिलरी व तेनसिंग नोर्गेच्या २४ वर्षे आधीच एव्हरेस्ट सर केले होते की काय अश्या चर्चांना उधाण आले. परंतु त्या मोहिमेतील सहकाऱ्यांचे मत व ज्या परिस्थितीत मृतदेह सापडले त्यावरून त्यांना शिखर सर करण्यात अपयश आले असे बहुतेकांचे मत आहे.

१९५२ मध्ये स्विस संघाने शर्थीचे प्रयत्‍न केले या मोहिमेचे नेतृत्व एडवर्ड डुनॉं यांनी केले होते. डुनॉं यांना नेपाळकडून चढाईची परवानगी मिळाली होती. त्यांनी खूंबू हिमनदीमधून साउथ कोल ७,९८६ मीटर (२६,२०१ फूट) उंचावर पोहोचण्याचा मार्ग शोधून काढला. या मोहिमेत रेमंड लॅंबर्ट व शेर्पा तेनसिंग नोर्गे यांनी ८,५९५ मीटर (२८,१९९ फूट) इतकी उंची गाठली की तो नवा विक्रम ठरला. स्विस संघाला आल्प्समधील अनुभवाचा चांगलाच फायदा झाला तसेच त्यांचे शेर्पांशी वर्तन अतिशय खेळीमेळीचे असायचे यामुळे स्विस संघाला पूर्वीच्या ब्रिटिश संघांपेक्षा चांगले यश मिळाले.[१४][१५]

तेनसिंग नोर्गे व हिलरींचे पहिले पाउल[संपादन]

शेर्पा तेनसिंग नोर्गे यांचे छायाचित्र

१९५३ मध्ये ९वी ब्रिटिश मोहीम आखली गेली. या मोहिमेचे नेतृत्व अनुभवी ब्रिटिश अधिकारी जॉन हंट यांच्याकडे होते. यांनी पूर्वीच्या स्वीस मोहिमेच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उठवायचे ठरवले. त्या अंतर्गत, तेनसिंग नोर्गे याला मोहिमेत समाविष्ट करण्यात आले. हंट यांनी गिर्यारोहकांच्या दोन जोड्या बनवल्या. पहिली जोडी टॉम बॉर्डिलॉन व चार्ल्स इव्हान यांनी चढाईचे शर्थीचे प्रयत्‍न केले शिखरापासून १०० मीटरपर्यंत पोहोचण्यात २६ मे रोजी त्यांना यश मिळाले परंतु तोवर त्यांची फारच दमणूक झाली होती. परंतु त्यांनी बर्फात खोदलेले मार्ग, दोर व नेलेले ऑक्सिजनच्या नळकांड्या याचा फायदा तेनसिंग नोर्गे [१६] व न्यू झीलंडचे एडमंड हिलरी या जोडीला झाला. दोनच दिवसांनी नोर्गेहिलरी [१७] या जोडीने शिखरावर साउथ कोलच्या दिशेने कूच केले. २९ मे १९५३ रोजी सकाळी ११ वाजता सरतेशेवटी एव्हरेस्टवर मानवी पाऊल पडले. पहिले एव्हरेस्टवर कोण पोहोचले याचे हिलरी व नोर्गे जोडिने बरीच वर्षे गुपित कायम ठेवले होते. तेनसिंग नोर्गेने आपण हिलरींच्यानंतर पोहोचल्याचे काही काळाने मान्य केले.[१८]. शिखरावर हिलरी यांनी फोटो काढले व जोडीने मिठाई खाऊन आनंद साजरा केला.

एव्हरेस्ट सर केल्याची बातमी लंडनला राणी एलिझाबेथ यांच्या राज्याभिषेकाच्या दिवशी पोहोचली. एव्हरेस्ट सर केल्यामुळे ब्रिटिश संघाचे नेते जॉन हंट व हिलरी यांना सर या किताबाने सन्मानित करण्यात आले. तेनसिंग नोर्गे यांना जॉर्ज या मेडलने सन्मानित करण्यात आले. तर हिलरी यांना न्यू झीलंडचा सर्वोच्च पुरस्कार ऑर्डर ऑफ न्यू झीलंड मिळाला. ऑर्डर ऑफ न्यू झीलंड मिळवणारे हिलरी हे पहिले नागरिक होते. तेनसिंग नोर्गे यांना भारत सरकारनेही पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.

सागरमाथा

विना ऑक्सिजनचे प्रयत्‍न[संपादन]

८ मे १९७८ रोजी इटलीचे प्रसिद्ध गिर्यारोहक राईनहार्ड मेसनर यांनी ऑस्ट्रियाच्या पेतर हेबलर यांच्या साथीत एव्हरेस्टवर चढाई केली. या चढाईत कोणत्याही प्रकारच्या ऑक्सिजनच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आला नाही. राईनहार्ड मेसनर यांनी पुन्हा १९८० मध्ये एव्हरेस्ट वर पुन्हा एकदा विनाऑक्सिजन एकट्याने चढाई केली.[९][९][१९]

भारतीय चढाया[संपादन]

पाश्चिमात्य देशांप्रमाणेच भारतातही गिर्यारोहकांचे एव्हरेस्टवर चढाई करण्याचे स्वप्न असते. परंतु बहुतेकांना जबर खर्चामुळे ते परवडत नाही. जरी एव्हरेस्ट हे भारतातले शिखर नसले व खर्च अति असला तरी भारतीयांनी केलेल्या चढायांची संख्या लक्षणीय आहे. पहिले चढाई करणारे तेनसिंग नोर्गे त्यानी नंतरच्या काळात भारतीय नागरिकत्व घेतले होते. त्यानंतरच्या बहुतांशी भारतीय चढाया ह्या भारतीय सैन्यदलातर्फे आखल्या गेल्या. पहिली भारतीय मोहीम १९६०मध्ये राबवली गेली. या मोहिमेचे नेतृत्व ब्रिगेडियर जी. सिंग यांच्याकडे होते. परंतु पहिले यश १९६५ मधील तिसऱ्या मोहिमेत मिळाले.१९८४ मधील नागरी मोहिमेत बचेंद्री पाल ह्या एव्हरेस्ट सर करणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला गिर्यारोहक झाल्या. त्यानंतरही अनेक भारतीय महिलांनी एव्हरेस्ट सर करण्यात यश मिळवले आहे.

मराठी पाऊल[संपादन]

एव्हरेस्ट फिरणारे त्रिमितीय चित्र

१९ मे १९९८ रोजी पुण्याचे सुरेंद्र चव्हाण यांनी एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली. हृषीकेश यादव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय पथकातील सुरेंद्र चव्हाण यांनी १९९८ मध्ये मोसमातील पहिल्या चढाईचा मान मिळवला.[२०] यापूर्वी २ मे १९९२ रोजी डॉ. दीपक कुलकर्णी यांना चढाई करताना मरण आले [२१]. १९ मे, २०१६ रोजी रफीक शेख यांनी हे शिखर सर केले.

महत्त्वाच्या घडामोडी[संपादन]

१९९६मधील दुर्घटना[संपादन]

एव्हरेस्टवर १९९६ च्या चढाईच्या मोसमात एकूण १५ गिर्यारोहकांचा मृत्यू [२२] झाला व गिर्यारोहकांसाठी सर्वात भयानक वर्ष अशी नोंद झाली. त्यातील ११ मे रोजी सर्वाधिक ८ जण मरण पावले. या घटनेचे मोठ्या प्रमाणावर पडसाद उमटले, भारतातही वृतपत्रांत हा विषय चांगलाच गाजला व एकूणच एव्हरेस्टवर चढाईसाठी व नाव कमवण्यासाठी गिर्यारोहकांकडून हलगर्जी होत असल्याचा दावा करण्यात आला. तसेच नेपाळ सरकारवरही एव्हरेस्टच्या मोहिमांचे बाजारीकरण केल्याचा आरोप ठेवण्यात आला. एव्हरेस्टवर चढाईसाठी पात्रता निकष कडक करण्याची सार्वत्रिक मागणी झाली.

मे २००४ मध्ये कॅनडामधील टोरोंटो विद्यापीठातील डॉ केंट मूरजॉन सेंपल यांनी अभ्यासान्ती असा निष्कर्ष काढला की, ११ मे १९९६ रोजी एव्हरेस्ट परिसरात अत्यंत विचित्र हवामान निर्माण झाले होते ज्यामुळे त्या उंचीवरील ऑक्सिजन फारच विरळ झाला होता, ऑक्सिजनची पातळी १४ % पेक्षाही खाली आली होती या हवामानात प्राणहानी होणे शक्य असते.[२३][२४]

हे पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ दाहाल, फणीन्द्र. "सगरमाथाको नयाँ उचाइ ८,८४८.८६ मिटर भएको नेपाल र चीनको घोषणा". बीबीसी न्यूझ नेपाली. 8 डिसेंबर 2020 रोजी पाहिले.
  2. ^ says, Mahesh Pathade (2020-04-29). "काय आहे माउंट एव्हरेस्टचा इतिहास?". kheliyad (इंग्रजी भाषेत). 2021-03-28 रोजी पाहिले.
  3. ^ G. O. Dyhrenfurth: Zum Dritten Pol. München, 1952, S. 27ff
  4. ^ "China says Mount Qomolangma stands at 8844.43". Xinhua online. 2007-04-01 रोजी पाहिले.
  5. ^ "Everest not as tall as thought". News in Science. 2007-04-01 रोजी पाहिले.
  6. ^ a b The "base" of a mountain is a problematic notion in general with no universally accepted definition. However for a peak rising out of relatively flat terrain, such as Mauna Kea or Denali, an approximate height above "base" can be calculated. For Everest the situation is more complicated, since it only rises above relatively flat terrain on its north (Tibetan Plateau) side. Hence the concept of "base" has even less meaning for Everest than for Mauna Kea or Denali, and the range of numbers for "height above base" is wider. In general, comparisons based on "height above base" are somewhat suspect.
  7. ^ "NOVA Online: Surviving Denali, The Mission". NOVA. 2007-06-07 रोजी पाहिले.
  8. ^ Mount Everest (1:50,000 scale map), prepared under the direction of Bradford Washburn for the Boston Museum of Science, the Swiss Foundation for Alpine Research, and the National Geographic Society, 1991, ISBN 3-85515-105-9
  9. ^ a b c d "Ascent Routes on Everest". 2008-01-23 रोजी पाहिले.
  10. ^ Thompson, Kalee. "Everest Time Line: 80 Years of Triumph and Tragedy". 2008-03-28 रोजी पाहिले.
  11. ^ "Climbing Mount Everest". 2008-10-24 रोजी पाहिले.
  12. ^ Team Everest 03. "Mt. Everest Information". Archived from the original on 2010-02-11. 2008-10-24 रोजी पाहिले.
  13. ^ William Buxton. "From First Sight to Summit: A Guide to the Literature on Everest up to the 1953 Ascent" (PDF). 2008-01-23 रोजी पाहिले.
  14. ^ Documentry by Peter Hillary
  15. ^ "Tenzing Norgay GM". Archived from the original on 2007-04-14. 2007-06-21 रोजी पाहिले.
  16. ^ "Edmund Hillary : First on Everest". kheliyad (इंग्रजी भाषेत). 2020-08-05. 2021-03-28 रोजी पाहिले.
  17. ^ "हिमालयातला वाघ ः तेन्झिंग नोर्गे". kheliyad (इंग्रजी भाषेत). 2020-07-21. 2021-03-28 रोजी पाहिले.
  18. ^ Tenzing Norgay and James Ramsey Ullman, Man of Everest (1955, also published as Tiger of the Snows)
  19. ^ "Everest - First without oxygen". NOVA Online. 2008-03-28 रोजी पाहिले.
  20. ^ http://www.k2news.com/archive/98.htm
  21. ^ http://www.adventurestats.com/tables/removed/evfat.htm Archived 2009-05-18 at the Wayback Machine.
  22. ^ "सगरमाथ्याची गदळगाथा". kheliyad (इंग्रजी भाषेत). 2020-05-15. 2021-03-28 रोजी पाहिले.
  23. ^ "The day the sky fell on Everest[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". New Scientist (2449): 15. 2004-05-29. 2006-12-11 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  24. ^ Peplow, Mark. "High winds suck oxygen from Everest Predicting pressure lows could protect climbers". 2006-12-11 रोजी पाहिले. Moore explains that these jet streaks can drag a huge draught of air up the side of the mountain, lowering the air pressure. He calculates that this typically reduces the partial pressure of oxygen in the air by about 6%, which translates to a 14% reduction in oxygen uptake for the climbers. Air at that altitude already contains only one third as much oxygen as sea-level air.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: