माक्सू पिक्त्सू
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
गुणक:
माक्सू पिक्त्सू (स्पॅनिश: Machu Picchu) हे
पेरू देशातील ऐतिहासिक इन्का साम्राज्यातील एक स्थळ आहे. माक्सू पिक्त्सू पेरूमधील कुस्को शहराच्या ८० किमी वायव्येला समुद्रसपाटीपासुन ८,००० फूट उंचीवर स्थित आहे व इन्का साम्राज्याच्या सर्वाधिक महत्वाच्या खुणांपैकी एक मानले जाते. युनेस्कोने माक्सू पिक्त्सूला जागतिक वारसा स्थान जाहीर केले आहे.