जगातील सात नवी आश्चर्ये
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
जगातील सात आश्चर्ये याच्याशी गल्लत करू नका.
जगातील सात नवी आश्चर्ये (२००१ - २००७) हा २००१ साली सुरू झालेला व जगातील सात नवी आश्चर्ये शोधून काढण्यासाठी बनवलेला एक परिक्रम होता. सध्य अस्तित्वात असलेल्या जगातील २०० इमारती व वास्तू ह्या कौलासाठी वापरल्या गेल्या. न्यू७वंडर्स नावाच्या झ्युरिक शहरामधील एका संस्थेने हा लोकप्रियता कौल घेतला. ह्या कौलामधील विजेत्या वास्तूंची घोषणा ७ जुलै २००७ रोजी लिस्बन येथे करण्यात आली.[१] न्यू७वंडर्सने ह्या कौलादरम्यान इंटरनेट व फोनद्वारे १० कोटी लोकांनी मते टाकल्याचा दावा केला. परंतु हा कौल शास्त्रशुद्ध पद्धतीने न घेतल्यामुळे एकाच व्यक्तीला अनेक वेळा मते देणे सहज शक्य होते. ह्यामुळे ह्या कौलाच्या अचूकतेवर शंका व्यक्त केली गेली आहे.
अनुक्रमणिका |
विजेते [संपादन]
| आश्चर्य | स्थान | चित्र |
|---|---|---|
| ताज महाल ताज महल تاج محل |
आग्रा, भारत | |
| चिचेन इत्सा Chi'ch'èen Ìitsha' |
युकातान, मेक्सिको | |
| क्रिस्तो रेदेंतोर O Cristo Redentor |
रियो दि जानेरो, ब्राझिल | |
| कलोसियम Colosseo |
रोम, इटली | |
| चीनची भिंत Wànlǐ Chángchéng |
चीन | |
| माक्सू पिक्त्सू Machu Pikchu |
कुस्को, पेरू | |
| पेट्रा البتراء al-Batrāʾ |
जॉर्डन |
ह्यांव्यतिरिक्त ऐतिहासिक जगातील सध्या अस्तित्वात असलेले एकमेव आश्चर्य गिझाचा पिरॅमिड ह्याला मानाचे स्थान देण्यात आले.
| आश्चर्य | स्थान | चित्र |
|---|---|---|
| गिझाचा भव्य पिरॅमिड أهرام الجيزة |
गिझा, इजिप्त |
इतर स्पर्धक [संपादन]
संदर्भ [संपादन]
- ↑ Dwoskin, Elizabeth. "Vote for Christ", न्यूजवीक, 2007-07-09.
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
|
|||||