एशियाड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एशियाडचे चिह्न

दर चार वर्षांनी आशियाई देशांमध्ये नियमीत होणाऱ्या उन्हाळी खेळ स्पर्धेला एशियाड म्हणतात. ऑलिंपिक खेळांनंतरची सगळ्यात मोठी आणि भव्य स्पर्धा म्हणून एशियाड स्पर्धा ओळखली जाते. या स्पर्धेचे आयोजन आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या मार्गदर्शन आणि नियंत्रणाखाली आशियाई ऑलिंपिक समिती इ.स. १९५१ पासून करीत आहे.

आशियातील प्रत्येक देशाची खेळ समिती आपल्या देशातील खेळाडुंची निवड करून या स्पर्धेसाठी पाठविते. या स्पर्धेतील सर्व खेळांसाठी अनुक्रमे सुवर्णपदक, रजतपदक आणि कांस्यपदक अशी तीन पदके दिली जातात.

[संपादन] खेळ

बॅडमिंटन, बास्केटबॉल, फुटबॉल, हँडबॉल, हॉकी, वॉलीबॉल, कबड्डी, क्रिकेट, टेनिस, टेबल टेनिस, जलतरण, नेमबाजी, असे विविध खेळ या स्पर्धेत खेळले जातात.

[संपादन] स्पर्धेचे आयोजन करणारे देश

वर्ष क्रमांक यजमान देश आणि शहर
1951
I
भारत भारत, नवी दिल्ली
1954
II
फिलिपिन्स फिलिपाईन्स, मनिला
1958
III
जपान जपान, टोक्यो
1962
IV
इंडोनेशिया इंडोनेशिया, जकार्ता
1966
V
थायलंड थायलंड, बँकॉक
1970
VI1
थायलंड थायलंड, बँकॉक
1974
VII
इराण इराण, तेहरान
1978
VIII2
थायलंड थायलंड, बँकॉक
1982
IX
भारत भारत, नवी दिल्ली
1986
X
दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया, सोल
1990
XI
चीन चीन, बीजिंग
1994
XII
जपान जपान, हिरोशिमा
1998
XIII
थायलंड थायलंड, बँकॉक
2002
XIV
दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया, बुसान
2006
XV
कतार कतार, दोहा
2010
XVI3
चीन चीन, ग्वांगझू

1 मूळ यजमान दक्षिण कोरिया
2 मूळ यजमान पाकिस्तान
3 प्रस्तावित स्पर्धा


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये