इंचॉन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंचॉन
인천
दक्षिण कोरियामधील शहर
इंचॉनचे दक्षिण कोरियामधील स्थान

गुणक: 37°29′N 126°38′E / 37.483°N 126.633°E / 37.483; 126.633

देश दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया
स्थापना वर्ष १८८३
क्षेत्रफळ १,०२९.४ चौ. किमी (३९७.५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५२ फूट (१६ मी)
लोकसंख्या  
  - शहर २८,७०,५४५
  - घनता २,६०० /चौ. किमी (६,७०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०९:००
incheon.go.kr


इंचॉन (कोरियन: 인천) हे दक्षिण कोरिया देशामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे (सोलबुसान खालोखाल) शहर आहे. हे शहर कोरियन द्वीपकल्पाच्या वायव्य भागात पिवळ्या समुद्रकिनाऱ्यावर वसले असून ते कोरियामधील एक मोठे बंदर व औद्योगिक केंद्र तसेच दक्षिण कोरियामधील सहा विशेष महानगरी शहरांपैकी एक आहे. सोल महानगर परिसराचा भाग असलेल्या इंचॉनची लोकसंख्या सुमारे २८ लाख आहे.

इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ हा दक्षिण कोरियामधील सर्वात मोठा विमानतळ ह्याच शहरात स्थित आहे. २०१४ आशियाई खेळ इंचॉनमध्ये १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान भरवले जातील.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: