संगमनेर तालुका
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संगमनेर तालुका | |
---|---|
१९.५७°उ.अ. ७४.२२°पू.रे. | |
राज्य | महाराष्ट्र, भारत |
जिल्हा | अहमदनगर जिल्हा |
जिल्हा उप-विभाग | संगमनेर |
मुख्यालय | संगमनेर |
क्षेत्रफळ | १७०५ कि.मी.² |
लोकसंख्या | ४३९८०६ (२००१) |
शहरी लोकसंख्या | ७ लाख (२०१९) |
साक्षरता दर | ६५.२१ |
लिंग गुणोत्तर | ९४६ स्री ♂/♀ |
प्रमुख शहरे/खेडी | घुलेवाडी,साकूर, घारगाव, आश्वी, निमोण, धांदरफळ,तळेगाव दिघे, पारेगाव बुll, बोटा |
तहसीलदार | अमोल निकम |
लोकसभा मतदारसंघ | शिर्डी |
विधानसभा मतदारसंघ | संगमनेर |
आमदार | बाळासाहेब थोरात |
पर्जन्यमान | ४१६.६ मिमी |
कार्यालयीन संकेतस्थळ |
नद्या - प्रवरा, मुळा, म्हाळुंगी,आढळा , कच
संगमनेर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे.[१] संगमनेर शहर येथे तालुक्याचे मुख्यालय आहे.
संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथे इसवी सनपूर्व १५०० या काळातील पुरातन संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत.[२]
अहमदनगर शहरानंतर संगमनेर हे जिल्ह्यातील दुसरे सर्वात मोठे शहर आहे आणि ते मोठ्या बाजारपेठ (कापड, किराणा सामान, इलेक्ट्रॉनिक्स, वाहन, दागिने) तसेच शैक्षणिक सुविधा, दूध प्रक्रिया उद्योग यासाठी प्रसिद्ध आहे. संगमनेर हे जिल्ह्याचे "हॉस्पिटल हब" म्हणूनही ओळखले जाते.[३] शहर मध्यवर्ती ठिकाणी (मुंबई, पुणे आणि छत्रपती संभाजी नगर यांच्या मध्यभागी आहे) आणि पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नाशिकपासून फक्त दोन तासावर आहे. ऊस लागवडीसाठी आधीच प्रसिद्ध असलेल्या संगमनेरला आता टोमॅटो तसेच डाळिंबाचे केंद्र म्हणूनही ओळखले जाते.
संगमनेरची 'कृषी उत्पन्न बाजार समिती' ही देशातील प्रमुख बाजारपेठांपैकी एक मानली जाते. संगमनेर हे जिल्ह्यातील बहुतेक रहदारीचे शहर म्हणून ओळखले जाते आणि आता नाशिक पुणे रेल्वेमार्गाचे संगमनेर शहर येथे स्थानक प्रस्तावित आहे.[४] मध्यवर्ती स्थानामुळे, शहरातील बसस्थानक 24 तास उच्च पातळीवर सार्वजनिक वाहतुकीसह खुले आहे. संगमनेर येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे बसस्थानक हे महाराष्ट्र राज्यातील सर्वात हायटेक बसस्थानक आहे. राज्य सरकारच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक - २०२४ अभियानात अ वर्ग बसस्थानक या प्रकारात संगमनेर बसस्थानकास तृतीय क्रमांक मिळाला आहे.[५] गुजरात, कर्नाटक आणि मध्य प्रदेशच्या बसेसही दररोज येथे येतात.
तालुक्यातील गावे
[संपादन]साकूर, समनापूर ,पेमगिरी, जोर्वे , धांदरफळ खुर्द, धांदरफळ बु, चिखली
खांडगाव, वडगावपान, वडगाव लांडगा, जवळेकडलग, चंदनापुरी, राजापूर, पोखरी बाळेश्वर, नान्नज दुमाला, तळेगाव, कसारा, पारेगाव.
पारेगाव बुll हे गाव अश्विनाथ बाबा / आशापीर बाबा दर्गा यासाठी सुप्रसिद्ध आहे.
अकलापूर या गावात एकमुखी दत्ताचे देऊळ आहे. ही पुरातन मूर्ती एका टेकडीवर खोदकाम करताना सापडली. दर गुरुवारी सकाळी ८.३० वाजता येथे महाआरती होते.
पेमगिरी गावात १.५ हेक्टर क्षेत्र व्यापलेले एक प्राचीन प्रसिद्ध वडाचे झाड आहे.... संगमनेर तालुक्यातील गावे पुढील प्रमाणे आहेत... आभाळवाडी, अजमपूर, अकलापूर, अंभोरे, आंबी दुमाला, आंबी खालसा, अरमपुर, आश्वी बु,., अश्वी खु., औरंगपुर, बाळापूर, बाम्बलेवाडी, भोजदरी, बिरेवाडी, बोरबनवाडी, बोटा, चंदनापुरी, चणेगाव, चिकणी, चिखली, चिंचपुर बु., चिंचपुर खु., चिंचोली गुरव, चोर कौठे(देवकौठे), दाढ खु., दरेवाडी, देवगाव, धांदरफळ बु., धांदरफळ खु., ढोलेवाडी, धुपे, डिग्रस, डोळासणे, गाभणवाडी(आनंदवाडी), घारगाव, गोडसेवाडी, गुंजाळवाडी, गुंजाळवाडी पठार, घुलेवाडी हंगेवाडी, हसनाबाद, हिवरगांव पठार, हिवरगांव पावसा, जाखुरी, जांभुळवाडी, जांबूत बु., जांबूत खु., जवळे बाळेश्वर, जवळे कडलग, जोर्वे, जुनेगांव, काकडवाडी, कानसवाडी, कणकापूर, कानोली, कर्हे, कर्जुले पाथर, करुले, कसारा दुमाला, कसारे, कौठे बु., कौठे धांदरफळ, कौठे कमलेश्वर, कौठे खु., कौठेवाडी, कौठे मलकापूर, केळेवाडी, खळी, खांबे, खंदरमाळ, खांडगाव, खंडेदरा, खांजापूर, खराडी, खरशिंदे, कोकणेवाडी, कोकणगांव, कोल्हेवाडी, कोळवाडे, कोंची, कुंभारवाडी, कुरकुंडी, कुरण, कुरकुटवाडी, लोहारे, महालवाडी, मालदाड, मालेगांव हवेली, मालेगाव पठार, मालूंजे, मालवाडी, मांचि, मांडवे बु., मंगळापूर, मनोली, मेंढवन, मेंगाळवाडी, म्हसवंडी, मिरपूर, मिर्जापूर, निमगांव बु.,नांदूर खंदरमाळ, नांदुरी दुमाला,नान्नज दुमला,निळवंडे,निमज,निंभाळे,निमगांव भोजपूर,निमगांव जाळी,निमगांव खु.,निमगांव तेंबी,निमोन,ओझर बु,.ओझर खु.,पळसखेडे,पानोडी,पारेगाव बु.,पारेगाव खु.,पेमगिरी,पेम्रेवादी,पिंपळे,पिंपळगाव देपा,पिंपळगांव कोंझीरा,पिंपळगाव माथा,पिंपरणे,पिंपरी लौकी, पोखरी बाळेश्वर, पोखरी हवेली,प्रतापुर,रहीमपूर,राजापूर,रणखांबवाडी,रायते,रायतवाडी,सदातपुर,साकुर,समनापूर,संगमनेर खु.,सांगवी,सारोळेपठार,सावरचोळ,सावरगांव घुले,सावगांव तळ,सायखिंडीशेडगाव,शेळकेवाडी,शेंडेवाडीशिपलापूर,शिंदोडी,शिरापूर,शिरसगांव,शिवापूर,सोनेवाडी,सोनोशी,सुकेवाडी,तळेगाव,तिगाव उम्बरी,वैदूवाडी,वडगाव लांडगा,वडगाव पान,वडझरी बु.,वडझरी खु.,वाघापूर,वनकुटे,वरुडी फाटा,वरवंडी,वेल्हाळे,यिलखोपवाड,झरेकाठी,झोळे.
संदर्भ
[संपादन]- ^ "Villages & Towns in Sangamner Taluka of Ahmadnagar, Maharashtra". www.census2011.co.in. 2024-08-03 रोजी पाहिले.
- ^ "जोर्वे". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2019-07-04. 2024-08-03 रोजी पाहिले.
- ^ देशपांडे, डॉ सागर (2022-06-12). "प्राचीन वारसा आणि चार नद्यांचा संगम!". Marathi News Esakal. 2024-08-03 रोजी पाहिले.
- ^ वाकचौरे, प्रविण (2024-02-21). "Political News : सत्यजीत तांबे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला; पुणे-नाशिक रेल्वेमार्ग संगमनेर तालुक्यातून नेण्याची केली मागणी". Marathi News Saam TV. 2024-08-03 रोजी पाहिले.
- ^ author/online-lokmat (2024-02-14). "स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात जळगाव एसटी विभागातील चोपडा बसस्थानक राज्यात दुसरे". Lokmat. 2024-08-03 रोजी पाहिले.
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- "संगमनेर तालुक्याचा नकाशा". ८ मार्च २०१८ रोजी पाहिले.
सिन्नर तालुका नाशिक जिल्हा | कोपरगाव तालुका | |||
अकोले तालुका | राहाता तालुका | |||
संगमनेर तालुका | ||||
जुन्नर तालुका पुणे जिल्हा | पारनेर तालुका | राहुरी तालुका |