धांदरफळ खुर्द
Appearance
धांदरफळ खुर्द हे संगमनेर तालुक्यातील संगमनेर शहराच्या पश्चिमेला ११ किलोमीटर अंतरावरील गाव आहे. हे गाव प्रवरा नदीतीरी वसलेले आहे. येथे श्री क्षेत्र बिरोबा मंदिर हे जागृत देवस्थान आहे. गावाची लोकसंख्या अंदाजे ३००० ते ४००० असावी. हे गाव ऊस, कांदे, टोमॅटो, भुईमूग, गहू, हरबरा, कलिंगड, चिकू, डाळिंब, दूध इत्यादींसाठी प्रसिद्ध आहे.
ह्या गावाचे रहिवासी.बी.जे.खताळ हे महाराष्ट्र राज्याचे (पाटबंधारे मंत्री) कॅबिनेट मंत्री होते.
ते त्या काळी गाजलेले नामवंत वकील होते. त्यांनी या गावात बी.जे.खताळ या नावाचे विद्यालय सुरू केले.