जोर्वे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जोर्वे संगमनेर तालुक्यातील, (अहमदनगर जिल्हा) गाव आहे

जोर्वे येथे पुरातन काळातील संस्कृतीचे अवशेष प्रथमः सापडले जे १५०० इ.पु. चे आहेत. या संस्कृतीचे नामकरण गावाच्या नावाहुन करण्यात आले आहे. त्यात मुख्यतः रंगवलेले भांडी व तांब्यापासुन बनवलेले भांडी आणि शस्त्रे सापडली. येथील लोक कोकण वगळता सर्व महाराष्ट्रात पसरले. येथील अर्थव्यवस्था मुख्यतः शेती, पशुपालन, शिकार व मासेमारीवर आधारलेली आहे. ते विविध पिके पिकवत होते. येथील घरे मोठे चौकोनी, चट्टे व माती यांपासून बनवलेली असत. धान्य कोठारांत व कनगीत साठवलेली आढळते. स्वयंपाक दोन कोन्याच्या चुलींवर घरात केला जाई, व बाहेर जाळावर प्राण्यांचे मांस भाजले जाई.

तत्कालीन लोक पुनर्जन्मावर विश्वास ठेवत असत, त्यामुळे मृत व्यक्तींना घरातच दफन केले जाई. लहान मुलांना भांडे एकमेकांना जोडून त्यात गाडले जाई. वयस्कांना पालथे उत्तरेकडे डोके करून दफन केले जात होते. त्यांचे पाय भूत तयार होऊ नये म्हणून तोडले जाई.

हेही पहा[संपादन]

जोर्वे (पुरातत्त्व उत्खनन स्थळ)