तेलंगणाचे मुख्यमंत्री
तेलंगणाचे मुख्यमंत्री
తెలంగాణ రాష్ట్ర ముఖ్యమంత్రి Chief Minister of The State of Telangana | |
---|---|
तेलंगणाची राजमुद्रा | |
भारतीय ध्वजचिन्ह | |
शैली | राज्यसरकार प्रमुख |
सदस्यता | तेलंगणा विधानसभा अथवा तेलंगणा विधान परिषद |
वरिष्ठ अधिकारी | तेलंगणा राज्यपाल |
नियुक्ती कर्ता | तेलंगणाचे राज्यपाल |
कालावधी | ५ वर्ष |
तेलंगणाचे मुख्यमंत्री हे भारताच्या तेलंगणा राज्याचे सरकारप्रमुख आहे. भारतीय संविधानानुसार राज्यप्रमुख जरी राज्यपाल असला तरी राज्याची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. तेलंगणा विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला राज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो.
२०१४ साली आंध्र प्रदेश राज्यामधून तेलंगणा राज्य वेगळे करण्यात आले. २ जून २०१४ रोजी के. चंद्रशेखर राव हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले, तर ७ डिसेंबर २०२३ रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अनुमुला रेवंत रेड्डी यांनी दुसरे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि ते विद्यमान मुख्यमंत्री आहेत.
यादी
[संपादन]क्र. | नाव | चित्र | पदावरील काळ | कार्यकाळ | निवडणूका | पक्ष | ||
---|---|---|---|---|---|---|---|---|
१ | के. चंद्रशेखर राव | २ जून २०१४ | १२ डिसेंबर २०१८ | ९ वर्षे, १८७ दिवस | २०१४ (१ ली विधानसभा) |
भारत राष्ट्र समिती | ||
१३ डिसेंबर २०१८ | ६ डिसेंबर २०२३ | २०१८ (२ री विधानसभा) | ||||||
२ | अनुमुला रेवंत रेड्डी | ७ डिसेंबर २०२३ | विद्यमान | ० वर्षे, ३३७ दिवस | २०२३ (३ री विधानसभा) |
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |