चातुर्वर्ण्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हिंदू वर्णव्यवस्था या पानावरून पुनर्निर्देशित)

चातुर्वर्ण्य किंवा चार वर्ण (हिंदू धर्मातील वर्णव्यवस्था) हे मनुस्मृतीसारख्या ब्राह्मणी पुस्तकातील सामाजिक वर्ग आहेत.[१][२][३] हिंदु साहित्याने या वर्णांद्वारे हिंदू धर्माला चार भिन्न वर्गात वर्गीकृत केले:[१][४]

प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेतील चार वर्ण Aum.svg
ब्राह्मणक्षत्रियवैश्यशूद्र


वरील चारपैकी एका वर्णात मोडणाऱ्या समुदायाला किंवा वर्गाला सवर्ण म्हणतात. आज हे सर्व वर्ण प्रगत वर्गात (forward castes) मोडतात. अनुसूचित जाती (किंवा अस्पृश्य, दलित) आणि अनुसूचित जमाती यांना चातुर्वर्ण्यात स्थान दिले नाही, कारण यांना अवर्ण म्हटले गेले.[६][७] या दलित-आदिवासींना चौथ्या वर्णापेक्षाही पाचवा वर्णाचा सर्वात खालगा दर्जा दिला गेला, जो अवर्ण होता. पहिल्या ब्राह्मण वर्णाकडून या पाचव्या वर्णावर अस्पृश्यता लादली गेली.

कार्ये व लक्षणे[संपादन]

ब्राह्मण वर्णीयांची कार्ये व लक्षणे[संपादन]

शम, दम, तप, पावित्र्य, संतोष, क्षमा, सरळपणा, ज्ञान, दया, भगवत्परायणता आणि सत्य ही ब्राह्मणाची लक्षणे होत.

क्षत्रिय वर्णीयांची कार्ये व लक्षणे[संपादन]

युद्धामध्ये उत्साह, वीरता, धैर्य, तेजस्विता, त्याग, मनोजय, क्षमा, ब्राह्मणांबद्दल भक्ती, कृपा करणे आणि प्रजेचे रक्षण करणे ही क्षत्रियाची लक्षणे होत.

वैश्य वर्णीयांची कार्ये व लक्षणे[संपादन]

देव, गुरू आणि भगवंतांबद्दल भक्ती, धर्म-अर्थ-काम या तीन पुरुषार्थांचे रक्षण करणे, आस्तिकता, उद्योगशीलता आणि व्यावहारिक निपुणता ही वैश्याची लक्षणे होत.

शूद्र वर्णीयांची कार्ये व लक्षणे[संपादन]

वरिष्ठ वर्णांशी नम्रतेने राहणे, पवित्रता, स्वामीची निष्कपट सेवा, वैदिक मंत्राशिवाय यज्ञ, चोरी न करणे, सत्य, तसेच गाय व ब्राह्मणांचे रक्षण करणे ही शूद्राची लक्षणे होत.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ[संपादन]

  1. १.० १.१ {{{शीर्षक}}}. 
  2. त्रुटी उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Monier-Williams_2005_924 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  3. त्रुटी उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Malik_2005_p.48 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  4. {{{शीर्षक}}}. 
  5. {{{शीर्षक}}}. 
  6. Chandram, Bipan (1989. India's Struggle for Independence, 1857-1947, pp. 230-231. Penguin Books India
  7. Yājñika, Acyuta and Sheth, Suchitra (2005). The Shaping of Modern Gujarat: Plurality, Hindutva, and Beyond, p. 260. Penguin Books India
  • श्रीमद् भागवत महापुराण
  • स्कंध-७ वा-अध्याय ११ वा (२१-२४)

बाह्य दुवे[संपादन]